1. बातम्या

शेतकऱ्यांनो असा कराल खतांचा कार्यक्षम वापर, जाणून घ्या..

सध्या रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली. कधी ही वाढ केद्र सरकारने केलेल्या अनुदान कपातीमुळे झाली, तर कधी जीएसटी आकारण्याच्या घोळात रासायनिक खतांचे दर वाढविण्यात आले आहेत. अलीकडे इंधन दरवाढ आणि रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणूनही खतांचा पुरवठा विस्कळीत होऊन दरवाढ करण्यात आली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmers will use fertilizers efficiently (image google)

farmers will use fertilizers efficiently (image google)

सध्या रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली. कधी ही वाढ केद्र सरकारने केलेल्या अनुदान कपातीमुळे झाली, तर कधी जीएसटी आकारण्याच्या घोळात रासायनिक खतांचे दर वाढविण्यात आले आहेत. अलीकडे इंधन दरवाढ आणि रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणूनही खतांचा पुरवठा विस्कळीत होऊन दरवाढ करण्यात आली आहे.

आता जागतिक बाजारातील कच्च्या मालाच्या किमती घटल्या आहेत. अशावेळी केंद्र सरकारने खत अनुदानात थोडी वाढ केली असती, एवढेच नव्हे तर हे अनुदान मागील वर्षी एवढे ठेवले असते तर या वर्षीच्या खरीप हंगामात रासायनिक खतांचे दर थोडेफार कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. परंतु जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या किमती कमी झालेल्या असताना केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कपात केली आहे.

नत्रयुक्त खते कडधान्यांना देण्याची गरज पडत नाही, एकदल पिकांसाठी अँझोटोबॅक्टरचा वापर आपण करू शकतो. मागील अनेक वर्षांपासून कृषी विभाग, विद्यापीठे हे सांगतात. परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद का मिळत नाही, याचाही विचार झाला पाहिजे, आता द्रवरूपात जैविक खते काही कंपन्यांनी आणली असून त्याचा बीजप्रक्रियेसाठी वापर वाढायला पाहिजे.

शेतकऱ्यांपेक्षा जास्त कमावणारे मध्यस्थ आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश सथाशिवम यांचे वक्तव्य, कृषी जागरणला दिली भेट

शेतकऱ्यांनी अगोदर बुरशीनाशके त्यानंतर कीटकनाशके आणि शेवटी जिवाणू खते या क्रमानुसार बीजप्रक्रिया करूनच पेरणी करायला पाहिजे. असे केल्याने कमी खर्चात उत्पादनात १०-१५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. पेरणी करताना अनेक शेतकरी खते फेकून देतात. त्यामुळे बरेच खत वाया जाते. त्याऐवजी शेतकऱ्यांनी खते पेरून द्यायला पाहिजेत.

तसेच संयुक्त दाणेदार खतांची कार्यक्षमता केवळ ३० टक्के असल्याने ते एकदाच देण्याऐवजी विभागणी करून खत मात्रा द्यायला हव्यात. शिवाय विद्राव्य खतांचा वापर शेतकऱ्यांनी वाढवायला हवा. विद्राव्य खते फवारणी अथवा ठिबकद्वारे देता येतात. यांची कार्यक्षमता ६० टक्के असून, ते पिकांना लवकर उपलब्ध होतात.

पैसे मिळवून देणारे पीक! लाल-पिवळ्या सिमला मिरचीपासून करा लाखोंची कमाई, जाणून घ्या..

सोयाबीनसह इतरही पिकांमध्ये वाढीच्या, फुले घरण्याच्या, दाणे भरण्याच्या अवस्थेत विद्राव्य खते दिली, तर उत्पादन वाढ शक्य आहे. विद्राव्य खतांवर शासन अनुदान देत नाही. त्यामुळे ती थोडी महाग आहेत. परंतु कार्यक्षम आहेत. आता नॅनो खते (युरिया, डीएपी) देखील आली असून, त्यांची कार्यक्षमता ९० टक्के आहे.

शेतकऱ्यांनो पेरण्यांची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला, जाणून घ्या..
दोन टप्प्यातील FRP चा कायदा मागे घेऊन FRP एकाच टप्प्यात करू, मुख्यमंत्र्यांची घोषणा
आयटीमधला जॉब सोडून हे दांपत्य करतंय शेती, शेंगांची पावडर विकून करतात लाखोंची कमाई...

English Summary: This is how farmers will use fertilizers efficiently, know.. Published on: 17 June 2023, 12:10 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters