1. बातम्या

यंदा मान्सून भरपूर बरसणार! १०१ % पर्जन्यवृष्टीची शक्यता- हवामान विभाग

दरवर्षी पावसाकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजासाठी यंदा आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरीपेक्षाही अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Monsoon forecast) वर्तवलेल्या अंदाजानुसार (IMD Monsoon Prediction) यंदा सरासरीच्या १०१% इतका पाऊस पडू शकतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
यंदा मान्सून भरपूर बरसणार!

यंदा मान्सून भरपूर बरसणार!

दरवर्षी पावसाकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजासाठी यंदा आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरीपेक्षाही अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Monsoon forecast) वर्तवलेल्या अंदाजानुसार (IMD Monsoon Prediction) यंदा सरासरीच्या १०१% इतका पाऊस पडू शकतो. यंदाचा मान्सून (Monsoon Rainfall 2021) हा नेहमीच्या तुलनेत सामान्यच राहणार असला तरी पर्जन्यवृष्टी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० % च्या आसपास होण्याची शक्यता आहे.

गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये ९८ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या १०१ टक्के असेल असे सांगण्यात येत आहे. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सूनला होणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात मान्सून बरसेल असे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. दरम्यान, संपूर्ण मॉन्सून हंगामात पाऊस जर ९६% ते १०४ % पडला तर या पर्जन्यवृष्टीला सामान्य मान्सून म्हणून ओळखले जाते.

 

कसा असेल यंदाचा मॉन्सून

आयएमडी (IMD) म्हणजे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पर्जन्यवृष्टी ९२% ते १०८% इतकी होऊ शकते. हाच मान्सून दख्खनच्या पठारावर ९३% ते १०८% इतका कोसळू शकतो. याशिवाय उत्तर-पूर्व भारतातही मॉन्सून दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर-पूर्व भारतात ९५% तर मध्य भारतात १०६% इतका पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात पर्जन्यमान कसे राहील याबाबत आयएमडी जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अंदाज वर्तवणार आहे.

 

मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

या आधी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता सुधारित अंदाजानुसार, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशिरा मान्सूनचे आगमन होणार आहे.

English Summary: monsoon imd revised its forecast of 101 percent rainfall this year Published on: 02 June 2021, 06:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters