शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून अनेक घोषणा केल्या जातात. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता शेतकऱ्यांना दिलासा agricultural देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आपत्कालीन क्रेडिट लाइन हमी योजनेचा परिव्यय 50,000 कोटी रुपयांनी वाढवून 5 लाख कोटी रुपये करण्यात आला.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात मिळणाऱ्या रकमेला देखील मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की, मंत्रिमंडळाने 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत मंजूर केली आहे.
यामुळे कर्ज फेडीबाबत शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकरी आत्महत्या देखील यामुळे कमी होणार आहेत. ते म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहोत. शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डवर अल्प कालावधीसाठी 3 लाख रुपयांचे कर्ज मिळते. त्याचे व्याज कमी करण्याची मागणी केली जात होती.
अमूल, मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची केली वाढ..
यावर सात टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर पैसे भरल्यास त्यांना तीन टक्के सूट मिळते. म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ चार टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैसे घेण्यास आणि ते फेडण्यास अडचणी येणार नाही.
आता होणार राडा! रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये येणार..
याबाबत बँकांकडून शेतकऱ्यांना ही सुविधा मिळते, शेतकर्यांवर जास्त व्याजदराचा बोजा पडू नये किंवा ज्या बँका शेतकर्यांना सात टक्के व्याजदराने कर्ज देतात, त्यांना व्याजदरात दीड टक्के मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
Farming Technique: आता करा जमिनीखाली आणि जमिनीवर दुहेरी शेती, ही पद्धत अवलंबल्यास मिळेल बक्कळ पैसा..
पन्नास खोके एकदम ओक्के! अधिवेशनात विरोधकांच्या घोषणेची राज्यात चर्चा..
काय ते कार्यकर्त्यांवरच प्रेम!! उदयनराजेंचा नादच खुळा, कार्यकर्त्याला तोंडाने भरवला पेढा..
Share your comments