शेतकऱ्यांचा नेता म्हणून ज्यांची प्रचिती आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या हिताची मागणी केली आहे. आग तसेच महापुर सारख्या आपत्कालीन संकटांमुळे नुकसान होणाऱ्या पिकांचाही पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
शेतकरी बंधू शेती व्यवसाय करताना पूर्वनियोजन तसेच योग्य व्यवस्थापन करत असतात. मात्र नैसर्गिक संकंटांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अमाप नुकसान होते.कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीठ, तर कधी वादळी वारे, यामुळे शेतकऱ्यांचे पूर्वनियोजन विस्कळीत होते. या अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे बरेच आर्थिक नुकसान होते.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री पीकविमा योजना' राबवली होती. कृषीमंत्री दादा भुसे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मंत्री राजू शेट्टी म्हणाले, मागील दोन वर्षे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. शिवाय दरवर्षी आपत्कालीन संकटांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरीही आर्थिक अडचणीत अडकला आहे.
या दोन जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊ लागली आहे. यातून ऊस आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. शासनाकडून अशा शेतकऱ्यांना मदत तर मिळत आहे पण ती अत्यंत अपुरी आहे. शिवाय या मदतीतून शेतकरी मशागतदेखील करू शकत नसल्याचे मंत्री राजू शेट्टी स्पष्ट केले. या जिल्ह्यातील शेतकरी नुकसान भरपाईतून सावरण्यासाठी पीक विमा उतरविण्यास तयार आहेत.
बापरे! रानडुकराचा जीवघेणा हल्ला; 62 वर्षीय शेतकऱ्याने दिली टक्करची लढाई
"ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 1 लाख आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच सदर विम्याचा हप्ता शेतकरी, पाटबंधारे विभाग व साखर कारखाने यांच्याकडून घेऊन राज्य सरकारच्या विमा कंपनीमार्फत पूरग्रस्त भागातील ऊस व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दिल्यास त्यांना दिलासा मिळेल. मी यापूर्वीही आपणांस व मुख्यमंत्री महोदयांना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत अवगत केले आहे. याबाबत शासन स्तरावरून लवकरात लवकर निर्णय घेऊन,कार्यवाही करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा", अशी मागणी त्यांनी केली आहे.
महतवाच्या बातम्या:
बारामतीच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! आता 'कृषी-फळबागा पर्यटना'ला मिळणार चालना
राज्य सरकारची मोठी घोषणा; 'या' वन्य प्राण्यामुळे शेतातील मालमत्तेचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
Share your comments