Kharif Season: खरीप हंगाम आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे आता केवळ खत-बियाणे याचीच चर्चा सुरु आहे. अशातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. महाबीजने मागील वर्षीचे बिजोत्पादन केलेले बियाणे संपल्यानंतर बाजार समितीमधून बियाणे खरेदी केले व तेच बियाणे हे महाबीजचे असल्याचे सांगत विकले असा आरोप मंत्री बच्चू कडू यांनी केल्यामुळे आता महाबीजचे बियाणे खरेदी करताना शेतकरी नक्कीच विचार करणार.
या वर्षी सोयाबीन बियाणांच्या किंमतीत महाबीज कंपनीने वाढ केली आहे. यावर प्रतिक्रिया देत असताना मंत्री बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र या गौप्यस्फोटामुळे शेतकऱ्यांच्या मनात महाबीजच्या बियाणांबाबत शंका नक्कीच निर्माण झाली असणार.
सबसिडी नसून ती लूट आहे
बियाणे हे केवळ सबसिडीवर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडेच कल राहतो. मात्र ही सबसिडी म्हणजे एखादा वाईट मित्र मिळाल्यासारखा आहे. वाईट मित्र जशी दारूची सवय लावते अगदी तसंच सरकारनेदेखील सबसिडी देऊन आमच्या मागे ही सवय लावून दिली आहे. असं मंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. पुढे ते असंही म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी व फसवणूक टाळण्यासाठी अनुदानाचा आधार काढावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच शेतकऱ्यांनी जर गटाने बियाणे निर्मिती केली तर एक ना एक दिवस या कंपन्या बंद पडतील असा विश्वासही त्यांनी दर्शविला.
लाखो रुपयांच्या कांद्यात सोडल्या शेळ्या; भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत
कृषी अधिकारी यांची भूमिका महत्वाची
शेती व्यवसायात कृषी अधिकाऱ्यांचे महत्व किती मोठं आहे. जर शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. एखाद्या मंत्र्याने शेतीबाबत एखादा निर्णय घेतला असेल किंवा एखाद काम सांगितलं असेल आणि जर त्या गोष्टीबाबत कृषी अधिकारी नकारात्मक असेल तर ते काम व्यवस्थित होऊच शकत नाही. कृषी अधिकारी हा प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधला दुआ आहे. त्यामुळे या गोष्टीचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे असेही मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
शेतीगटाचे महत्व
हंगामादरम्यान बियाणे निर्मितीच्या नावाखाली काही कंपन्या कोट्यावधी रुपये कमावतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच आता बिजोत्पादन कार्यक्रमाचे ज्ञान आत्मसात करून शेतकरी गट तयार करून त्याची विक्री केल्यास शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होईल. आणि कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसेल.
त्यामुळे आता शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेतीवर लक्ष केंद्रीत करावे असेही आवाहन मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
भाताची सुधारित लागवड आणि अधिक उत्पादनासाठी 'या' पद्धतीचा अवलंब करा
जमिनीवर बसून जेवा आणि दैनंदिन आजारांच्या समस्येपासून मुक्त व्हा; वाचा जबरदस्त फायदे
Share your comments