1. बातम्या

भारत आणि रशियामध्ये कृषी क्षेत्राबाबत सामंजस्य करार; आता कृषी क्षेत्राला मिळणार नवी भरारी..

बायोकॅप्सूलच्या व्यापारीकरणासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR ) अंतर्गत भारतीय मसाला संशोधन संस्था ( IISR ) ने रशियास्थित कंपनी Lysterra LLC सोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे. जैव-फर्टिलायझेशनसाठी एन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञान आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
रशियास्थित कंपनी Lysterra LLC सोबत  सामंजस्य करार

रशियास्थित कंपनी Lysterra LLC सोबत सामंजस्य करार

बायोकॅप्सूलच्या व्यापारीकरणासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR ) अंतर्गत भारतीय मसाला संशोधन संस्था ( IISR ) ने रशियास्थित कंपनी Lysterra LLC सोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे. जैव-फर्टिलायझेशनसाठी एन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञान आहे.

मायक्रोबियल एन्कॅप्स्युलेशन टेक्नॉलॉजी हे आयआयएसआर द्वारे पेटंट केलेला एक प्रमुख शोध आहे. हे तंत्रज्ञान पिकांना जैव-खते म्हणून सर्व कृषीदृष्ट्या महत्त्वपूर्ण सूक्ष्मजीव एन्कॅप्स्युलेट करण्यासाठी वापरला जातो.या अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करून बायोकॅप्सूलच्या व्यावसायिक उत्पादनासाठी आयआयएसआरकडून चार भारतीय कंपन्यांनी आधीच नॉन-एक्सक्लुझिव्ह परवाने मिळवले आहेत.

टी. महापात्रा, महासंचालक, ICAR, व्हर्च्युअल बैठकीचे अध्यक्षस्थानी होते. ज्यात आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. रशियास्थित कंपनी Lysterra LLC ही पीक संरक्षण उत्पादनांच्या उत्पादनासाठी ओळखली जाते, त्याचे अध्यक्ष व्लादिमीर झारेव्ह , महासंचालक लिउडमिला अल्गिनिना आणि विपणन प्रमुख यांनी प्रतिनिधित्व केले.

आता सातबारा उतारा करता येणार स्कॅन, शेतकऱ्यांचा फायदाच फायदा..

डॉ. महापात्रा म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन तंत्रज्ञान निर्मिती आणि व्यापारीकरणाचे प्रयत्न गरचेचे आहेत. आयआयएसआरचे संचालक सीके थंकमणी म्हणाले की, आयआयएसआरने विकसित केलेल्या मायक्रोबियल एन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करणारी लिस्टेरा एलएलसी ही पहिली परदेशी कंपनी आहे. त्यांनी संस्थेसाठी "अभिमानाचा क्षण" असे देखील वर्णन केले.

महत्वाच्या बातम्या:
शेण खरेदीच्या बहाण्याने शेतकऱ्यांना लाखोंचा गंड
खुशखबर! धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

English Summary: Memorandum of Understanding between India and Russia on Agriculture; Now the agricultural sector will get a new lease of life. Published on: 05 July 2022, 04:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters