Beed : सध्या राज्यात शेतकरी प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, महागाई व इतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेले काही दिवस या सगळ्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनासारखे अनेक पर्याय निवडले जात आहेत. असाच काहीसा प्रसंग माजलगाव तालुक्यात घडला आहे. माजलगाव तालुक्यातील दोन गावच्या ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. असा आरोप गावच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी केला आहे.
यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी या मुलांनी जिल्हा परिषदेसमोर गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषणही सुरु केले. मात्र हे उपोषण दुर्लक्षित केले गेले.
असं म्हणतात की,जब सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी कर लेनी चाहिए। आणि म्हणूनच सरळ मार्गाने न्याय मिळेल याची शाश्वती नसल्याने या मुलांनी थेट सत्ताधारी नेत्यांचे मुखवटे घालून आंदोलन करायला सुरवात केली आहे.
उपोषणकर्त्यांनी मुख्यमंत्र्यापासून ते बीड मधील स्थानिक आमदार यांचे मुखवटे देखील घातले होते. या नवख्या युक्तीमुळे आता हे उपोषण संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. मात्र या नवख्या प्रयोगाला यश मिळेल का आणि त्यांच्या मागण्या मान्य होतील का हे पहावे लागणार आहे. माजलगाव तालुक्यातील लोणगाव तसेच नित्रुड येथील ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
Breaking : स्वाभिमानी संघटना: हमीभाव कायद्याच्या जनजागृतीचा डंका आता देशभरात वाजणार
भ्रष्टाचाराची नीट चौकशी व्हावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांची मुलं बीडच्या जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषण करत आहेत .गेल्या चार दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरु होते मात्र याबाबत अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नाही या गोष्टीचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढार्यांचे मुखवटे परिधान करून आंदोलन केले.
गेल्या चार दिवसांपासून लोणगाव तसेच नित्रुड ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी या 2 गावातील शेतकऱ्यांच्या मुलांनी केली आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने, शेतकऱ्यांच्या या पोरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांचे मुखवटे घालून उपोषण चालू ठेवले. हे अनोखे आंदोलन बीड जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आंदोलनकर्त्यांनी मागे न हटण्याचा निर्धार केला आहे. जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा त्यांनी घेतला आहे
महत्वाच्या बातम्या:
Breaking : केंद्र सरकारने रेशनकार्डबाबत घेतला मोठा निर्णय
Kidney Racket : धक्कादायक : रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट; 15 जणांवर गुन्हा दाखल
Share your comments