आमदार बच्चु कडू यांची योजना ; निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचं

20 April 2021 05:58 AM By: KJ Maharashtra
आमदार देणार ट्रॅक्टरसाठी डिझेल

आमदार देणार ट्रॅक्टरसाठी डिझेल

अचलपूर विधानसभा मतदार संघातील निराधार,  विधवा,  परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या पाठीशी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू खंबीरपणे उभे ठाकले आहेत.  त्यांना अचलपूर विधानसभा मतदार संघामध्ये ट्रॅक्टरचा डिझेल तुमचे ही अभिनव योजना राबवत आहे.

 कुटुंबातील कर्ता  व्यक्ती यांच्या निधनानंतर किंवा पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याची वेळ त्या महिलांवर येते. या महिलांना हे करत असतांना याच प्रकारच्या समस्या येतात.  जसे की,  नांगरणी,  वखरणी, पावसाळा सुरू झाला तर बी बियाण्यासाठी पैसा आणायचा कुठून अशा विवंचनेत या महिला भगिनी असतात.

 

नेमकी हीच समस्या हेरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमची योजना अमलात आणली.  या योजनेचा अचलपूर तालुक्यातील महिलांना लाभ होत आहे. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्रीश्रीमती इंदिरा आई कडू यांच्या वाढदिवसा प्रसंगी या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

 

या योजनेची सुरुवात अचलपूर विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. आतापर्यंत जर विचार केला तर जवळ जवळ शंभर एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून घेण्यात आले आहे.  या योजनेच्या माध्यमातूनराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू कुटुंबीय प्रमाणे एका आधार वडाची भूमिका निभावत आहेत.

MlA MLA Bachchu Kadu diesel tractor आमदार बच्चु कडू ट्रॅक्टर
English Summary: MLA Bachchu Kadu's plan; Our diesel tractor for destitute women farmers is yours

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.