राज्यात सध्या साखर उद्योग अडचणीत आला आहे. यामुळे अनेक कारखाने बंद पडले आहेत. असे असताना काही कारखाने मात्र तग धरून आहेत, तर काही कारखाने हे चांगल्या पद्धतीने चालवले जात आहेत. बारामतीमधील माळेगाव कारखाना राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. कारखान्याचे झालेले विस्तारीकरण आणि उच्चांकी गाळप याचा बोलबाला असतानाच कारखाना प्रशासन पुढचे पाऊल टाकत आहे. यामुळे कारखान्याची चर्चा सुरू आहे.
स्मार्ट ऊसतोडणी; माळेगाव कारखान्यात ऑनलाइन अॅपद्वारे ऊसतोडणी फिल्ड स्लिप ऊस उत्पादक शेतकर्यांना मोबाईलवर दिली जाणार आहे. तुटलेला ऊस किती कालावधीमध्ये गाळप झाला, तसेच फील्डमनने दिलेली स्लिप आणि तुटलेला ऊस हे बरोबर असल्याची खात्री दररोज केली जाणार आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
तसेच वाहनांचे ट्रॅकिंग होऊन ऊस लागण क्षेत्राची भौतिक स्थिती, कारखाना कार्यस्थळापासून ऊसतोडणीचे अंतर याचे नियोजन होणार आहे. तसेच तोडणीसाठी गेलेले वाहन किती काळ थांबले, तसेच ऊसतोडणी व वाहतूक यामधील कालावधी याची नोंद होईल. यामुळे हे काम देखील व्यवस्थित होणार आहे. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर चालू गाळप हंगाम स्थिती, ऊस, तसेच उसाची नोंद व गाळप अहवाल याबाबत माहिती मिळणार आहे.
मोठी बातमी! पेट्रोल डिझेलनंतर आता स्टील आणि सिमेंटचे दरही केले कमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय...
तसेच शेतकर्यांना उसाची केलेली नोंद, तुटून गेलेल्या उसाच्या खेपा, त्याचे काट्यावर भरलेले वजन, तसेच ऊस बिलापोटी होणारी कपात आणि मिळणारी रक्कम, याची अचूक माहिती मिळणार आहे. यानुसार सगळं गणित व्यवस्थित पार पडण्यास मदत होणार आहे. तसेच आरएफआयडी तंत्राचा वापर, सेन्सरचा वापर होऊन काट्यावर ऊस घेऊन आलेल्या वाहनाचे अचूक वजन होऊन तशा प्रकारचा संदेश संबंधित चालक आणि वाहतूकदारांना दिला जाईल.
'भीक मागून कृषिमंत्र्यांना पैसे देऊ पण कांद्याला रास्तच भाव घेऊ'
तसेच शेतकरी आपल्या शेतातून लागण केलेल्या क्षेत्राची नोंद करतील, नोंद झालेल्या क्षेत्राची मोजणी आणि ऑनलाइन ऊस रुजवात आणि निरीक्षण करता येईल, यासाठी ऑनलाइन लागण नोंदणी केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! खरिपाच्या तोंडावर खतांच्या पोत्याला फुलांचा हार, वाचा नेमकं काय आहे कारण..
दोन वर्षानंतर टोमॅटोने मालामाल केल्याने शेतकऱ्याने टोमॅटोच्या रोपाची काढली मिरवणूक
पेट्रोल, डिझेल होणार २० रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारकडून दिलासा मिळणार
Share your comments