सध्या देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे, जेथे वीज सर्वाधिक महाग आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे. याचा परिणाम प्रत्येक घरावर होणार आहे. आता दर महिन्याला त्यांना वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत.
वीज वितरणच्या प्रामुख्याने चार कंपन्या आहेत. MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड राज्य सरकारद्वारे चालवली जाते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे. महाराष्ट्रात वीज दरवाढ करण्यात आल्याने महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारे राज्य ठरले आहे. आंध्रप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजेचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत.
त्यामुळं आता आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांना वीज दरवाढीमुळं मोठा झटका बसला आहे. गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रात वीज दरवाढ होणार असल्याच्या चर्चा होत्या. याशिवाय टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी खाजगी क्षेत्रातही वीज वितरण करतात. याशिवाय मुंबईत बेस्टकडून प्रामुख्याने वीजपुरवठा केला जातो. वीज दरात ५ ते १० टक्के वाढ करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनो आडसाली ऊस व्यवस्थापन...
अशा परिस्थितीत प्रत्येक घराचे वीज बिल किमान 5-10 टक्क्यांनी वाढेल. आर्थिक वर्ष 2023-24 आणि आर्थिक वर्ष 2024-25 साठी दर वाढ करण्यात आली आहे. राज्यात वीज खरेदी दराचे नियोजन नसल्याने हे दर 5.36 रुपयांपर्यंत गेले आहेत. यात कपात होणे शक्य आहे. पण, या गैरनियोजनाचा फटका राज्यातील 2.93 कोटी ग्राहकांना बसत असून, महाराष्ट्रात विजेचे दर अधिक आहेत.
शेतकऱ्यांनो भेंडी लागवड व्यवस्थापन, जाणून घ्या..
दरम्यान, या दरवाढीविरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने दिल्लीतील विद्युत अपिलीय प्राधिकरणाकडे अपिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही दरवाढ कायम राहणार, की सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.
आधीच दर नाही, त्यात अनुदानासाठी जाचक अट, कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा पाणी..
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना अलर्ट..
महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची भीती! 24 तासांत 669 नवीन प्रकरणे, देशभरात आकडा वाढला..
Share your comments