महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे महाविकास आघाडी सरकारने निश्चित केले होते. परंतु मध्यंतरी कोरोना महामारी मुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून याचा फायदा जवळजवळ चौदा लाख शेतकऱ्यांना होणार आहे.झालेल्या आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या योजनेचे एकंदरीत स्वरूप
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13 लाख 85 हजार शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्ज खात्यांसाठी पाच हजार 722 कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
तसेच या योजनेचा लाभ हा 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने मयत झाल्यानंतर संबंधीत शेतकऱ्यांच्या वारसांनी जर कर्ज परतफेड केली असेल तर त्या वारसाला सुद्धा लाभ मिळणार आहे.
ही प्रोत्साहन राशी कुठल्या कालावधीत साठी ग्राह्य
सन 2017-18,2018-19 आणि 2019-20 या कालावधीत नियमित कर्ज परतफेड केले आहे त्यांच्यासाठी हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांत किंवा कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पिक कर्ज घेऊन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकर्यांचा या योजनेचा लाभ येणार आहे.
नक्की वाचा:मोठी बातमी: गावात बालविवाह झाला तर सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक होणार निलबिंत
सन 2018-19 या वर्षात असलेले अल्पमुदत पीककर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णता परतफेड केलेली असावे. तसेच 2019-20 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत परतफेड केलेले असावे
किंवा 2017-18 ते 2020 तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पिक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जे नंतरचे असेल त्या दिनांक पूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना या तीनही आर्थिक वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली.
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे वर उल्लेख केलेल्या तिन्ही वर्षात घेतलेल्या व त्या कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम जर पन्नास हजारापेक्षा कमी असेल तर या तीनही वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
नक्की वाचा:राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, शिंदे सरकारची मोठी घोषणा
Share your comments