1. बातम्या

राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, शिंदे सरकारची मोठी घोषणा

राज्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक वापरले जात असल्याने अनेक अडचणी येत आहेत. पर्यावरणाला यामुळे धोका निर्माण होत आहे. यामुळे आता प्लास्टिक (Plastic) वापराबाबत नव्या राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता प्लास्टिक प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, अशा वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Ban on plastic coated items in the state

Ban on plastic coated items in the state

राज्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक वापरले जात असल्याने अनेक अडचणी येत आहेत. पर्यावरणाला यामुळे धोका निर्माण होत आहे. यामुळे आता प्लास्टिक (Plastic) वापराबाबत नव्या राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता प्लास्टिक प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, अशा वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

यामुळे आता या वस्तू आपल्याला बाजारात मिळणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पर्यावरण (Environment) विभागासोबत एक बैठक झाली होती. त्यानंतर अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता या वस्तूंच्या उत्पादनाला, आयात, निर्यात तसेच वापरावर बंदी असणार आहे.

तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड वसूल केला जाणार आहे. दरम्यान, यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बैठकीत प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, किंवा त्या प्लास्टिक लॅमिनेटेड आहेत. अशा वस्तूंवर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली होती. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एका वर्षात 78 वेळा पेट्रोलचे दर वाढवले, आपचा खासदार संसदेत थेट मोदींना भिडला..

अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर कोणी करत नाहीना, हे पहाण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांवर धाडी टकाण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या;
'नंदी ब्लोअर' ची कमाल, आता ट्रॅक्टरचे काम बैलजोडीच्या माध्यमातून, अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा..
भारीच की! शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा शेती आणि 3 महिन्यात लखपती व्हा, जाणून घ्या..
कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप खासदाराची निवड, शरद पवारांच्या जागी वर्णी लागल्याने राष्ट्रवादीला धक्का

English Summary: Ban on plastic coated items in the state, Shinde government's big announcement Published on: 27 July 2022, 10:16 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters