जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जो काही पाऊस झाला त्यामुळे पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार इत्यादी नेते मंडळींनी बऱ्याच ठिकाणी पाहणी दौरे केले. त्यानुसार राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्रीय निकषाच्या दुप्पट तसेच दोन हेक्टर ची मर्यादा वाढवून ती 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला होता.
नक्की वाचा:IMD Alert: विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज; आज कुठे बरसणार पाऊस ?
परंतु निर्णय होऊन याबाबतचा आदेश मात्र निघाला होता परंतु आता त्याबाबतचा शासनादेश निघाला असून शासनाला आता नव्याने सर्वेक्षण करून मदतीचा प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. केंद्रीय निकषाच्या दुप्पट मदत व क्षेत्र मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टरपर्यंत वाढवत मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. परंतु त्या बाबतचा शासन आदेश निघाला नव्हता.
नव्याने तयार करावा लागणार प्रस्ताव
अगोदर प्रशासनाने जुने निकष यांच्या आधारित पंचनामे केले व आधीचे दोन हेक्टरच्या मर्यादेनुसार पंचनामे करून सदरचा प्रस्ताव तयार केला होता परंतु त्यानंतर शासनाने दोन हेक्टरची मर्यादा वाढवत 3 हेक्टर पर्यंत केली व मदत देखील दुप्पट देण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रशासनाला आता सगळा सर्वे नव्याने करून मदतीचा प्रस्ताव नवीन तयार करावा लागणार आहे. यामध्ये शासनाने जून आणि ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीचा उल्लेख केला असल्यामुळे सध्या ऑगस्ट महिना असून अजूनही दोन महिने अद्याप बाकी असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार की काय अशी स्थिती आहे.
अशी मिळेल मदत
1- ओलिताखालील पिकांना- हेक्टरी 27 हजार रुपये
2- कोरडवाहू- हेक्टरी 13 हजार सहाशे रुपये
3- फळबागांसाठी- हेक्टरी 36 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
Share your comments