1. बातम्या

Agri News: शंखी गोगलगाई मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा आणि पिक विमा बाबतही बरच काही…

जर आपण शेतकरी राज्यांचा विचार केला तर नैसर्गिक आपत्तीमुळे तर शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. परंतु त्यासोबतच विविध प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील हातातील पिके वाया जातात व अशा कीटकांच्या बंदोबस्तासाठी जो काही खर्च करावा लागतो तो वेगळाच असतो.एवढे करून देखील हातात उत्पादन येईलच याची खूप काही प्रकारचे शाश्वती शेतकऱ्यांना नसते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
snale influnce on crop

snale influnce on crop

जर आपण शेतकरी राज्यांचा विचार केला तर नैसर्गिक आपत्तीमुळे तर शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. परंतु त्यासोबतच विविध प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील हातातील पिके वाया जातात व अशा कीटकांच्या बंदोबस्तासाठी जो काही खर्च करावा लागतो तो वेगळाच असतो.एवढे करून देखील हातात उत्पादन येईलच याची खूप काही प्रकारचे शाश्वती शेतकऱ्यांना नसते.

आपल्याला माहित आहेच की यावर्षी शंखी गोगलगायीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रकारचे नुकसान झाले. जर आपण या गोगलगायीचा प्रादुर्भाव आता विचार केला तर मराठवाडा विभागातील या जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.

नक्की वाचा:Agri News: बंधुंनो! बटाटा दरवाढी मागील 'हे' आहे पश्चिम बंगाल कनेक्शन,वाचा सविस्तर तपशील

त्यामुळे या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळावी या संबंधीचे मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या आठवड्यात मराठवाड्याचा दौरा केला व संबंधित झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना पात्र करून आणि एक समिती नेमून या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.

नक्की वाचा:मोठी बातमी! जिल्हा बँक राज्य बँकेत होणार विलीन? केंद्र सरकारचे सहकार खाते त्या दिशेने

पिक विम्याच्या बाबतीत देखील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

 जर आपण पीक विम्याचा विचार केला तर झालेल्या नुकसानीची माहिती ही 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीकडे द्यावी लागते. ही तक्रार नोंदवण्यासाठी शेतकरी क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून कंपनीचा जो काही टोल फ्री नंबर असतो किंवा मेल आयडी असतो यावर तक्रार नोंदवावी लागते.

परंतु बरेच शेतकरी बंधूंना हे हव्या त्या प्रमाणात माहिती नसल्यामुळे बर्‍याच जणांना समस्या निर्माण होते. यासाठी 2021 मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून ऑफलाइन पद्धतीने जे काही विम्याचा क्लेम आहेत ते स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली होती.

परंतु आता 2022 या वर्षासाठी पीक विम्याचा क्लेम शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय कृषी विभागाच्या कार्यालयात तीन ते चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार असून त्यांच्याकडे शेतकरी ऑफलाइन पद्धतीने क्लेम करू शकणार आहेत. ही ऑफलाइन पद्धतीने क्लेम स्वीकारण्याची प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

नक्की वाचा:कुकुंबर मोझॅक व्हायरस (इन्फेक्शियस क्लोरोसिस) ओळख आणि नियोजन

English Summary: can get compansation to farmer for snale influnce on soyabioen crop Published on: 23 August 2022, 10:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters