हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Friday, 26 April 2019 04:56 PM


नवी दिल्ली:
हिंदी महासागराच्या पूर्व भागात तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात हा दाब वाढणार असून त्यानंतरच्या 12 तासात या भागात वादळ येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात हा पट्टा श्रीलंकेच्या किनाऱ्यावरुन तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, यामुळे येत्या 30 एप्रिल आणि 1 मे ला आंध्रप्रदेश तसेच तामिळनाडूच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या काळात समुद्रही खवळलेला राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 26 ते 30 एप्रिल या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.

bay of bengal indian ocean low pressure area हिंदी महासागर बंगालच्या उपसागर weather हवामान
English Summary: Low pressure area develops in Bay of Bengal and Indian Ocean

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.