लॉकडाऊनचा फटका : शेतकऱ्यानं तीन एकरातील झेंडूची शेती केली नष्ट

Monday, 13 April 2020 04:53 PM
प्रतिनिधीक छाया चित्र

प्रतिनिधीक छाया चित्र


कोरोना व्हायरसचा (corona virus)  प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.  परंतु या लॉकडाऊनचा फटका इतर उद्योगांसह शेतीव्यवसायलाही बसत आहे. नेहमी निसर्गाच्या अनिश्चितीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कोरोना व्हायरसचा फटका बसत आहे.  २० दिवसांपासून सर्वच व्यवहार ठप्प असल्याचा फटका देशातील अर्थव्यवस्थेला बसत आहे.

दरम्यान शेतीची कामे आणि त्याच्याशी संबंधित कामानां सूट देण्यात आली होती.   परंतु नाशवंत शेतमालाचे मात्र नुकसानच होत आहे.  भाजीपाल्याची आवक कमी बाजारात कमी झाली आहे, त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे.  भाजीपाला उत्पादकांसह फुल शेती करणाऱ्यांही मोठा आर्थिक फटका बसत आहे.  फुल विक्रीसाठी बाजारपेठच खुली नसल्याने शेतकरी फुलवलेली आपली शेती जमीन दोस्त करत आहे. बीड तालुक्यातील माळापुरी येथील एका शेतकऱ्याने तीन एकरातील झेंडूची शेती नष्ट केली आहे.  याविषयीची बातमी एका वृत्तसंस्थेने दिली आहे. फुले आलेली झाडे उपटून फेकल्याने चार लाखाच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले.  माळापुरी येथील या शेतकऱ्याचे नाव आहे, शौकतअली देशमुख.  देशमुख यांची पेंडगाव परिसरात जमीन आहे.

दरवर्षी ते फुल झाडांच्या लागवडीसह इतरही पिकांचे उत्पादन घेतात.  तीन एकर क्षेत्रावर साधारण दोन महिन्यांपूर्वी त्यांनी झेंडूच्या झाडांची लागवड केली होती.  वेळोवेळी त्यावर औषध फवारणी, खुरपणी करून मोठ्या मेहनतीने त्यांनी झेंडूचे पीक घेतले होते.  २५ दिवसांपूर्वी फुलांची एक खेप बाजारपेठेत पाठवली. मात्र सध्या फुले काढणीला आली तरी टाळेबंदीमुळे बाजारपेठेत पाठवणे शक्य झाले नाही. लॉकडाऊन मागे घेतली जाईल आणि कमीत कमी जिल्ह्यातील बाजारपेठ तरी खुली होईल, या आशेने आजपर्यंत झाडे जगविली.  अक्षयतृतीया पर्यंत सर्व काही ठीक झाले तर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता लॉकडाऊन  पुन्हा वाढणार असल्याने झाडांना ठेवून तरी काय करायचे हा प्रश्न सतावू लागल्याने शौकत देशमुख या शेतकऱ्याने झेंडूची झाडे उपटून फेकली.

marigold flower marigold farm beed lockdown locdown effect corona virus कोरोना व्हायरस शेतकऱ्याने नष्ट केली झेंडुची शेती लॉकडाऊनचा परिणाम लॉकडाऊन farmer destroy marigold farm
English Summary: Lock down Effect : farmer destroy three acres marigold farm

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.