भारतात आता शेती व्यवसायात (Farming) मोठा अमुलाग्र बदल बघायला मिळत आहे. भारतीय शेती (Indian Farming) आता दिवसेंदिवस हायटेक होत आहे. शेती व्यवसायात आता काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश होऊ लागला आहे.
देशातील वैज्ञानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. कृषी वैज्ञानिक रोजाना शेतीच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावत आहेत. यामध्ये नवीन पिकांच्या जाती (Crop Varieties) विकसित केल्या जाऊ लागल्या आहेत.
तसेच शेतीची पारंपारिक पद्धतीत बदल केला जात असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता वाढू लागला आहे. आता वैज्ञानिकांनी (Agriculture Scientists) एका नवीन टेक्निकचा वापर करून एकाच झाडाला टोमॅटो आणि बटाटे उत्पादित करण्याची किमया साधली आहे. मित्रांनो खरे पाहता या टेक्निकला ग्राफ्टिंग (Grafting Technology) असे म्हणतात.
बातमी कामाची! बारामाही मागणी असलेल्या या विदेशी फळाची शेती करा आणि कमवा बक्कळ; वाचा सविस्तर
या ग्राफ्टिंग टेक्निकचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून केला जातं आहे. मात्र याचा वापर आतापर्यंत केवळ झाडांमध्ये बघायला मिळत होता. मात्र कृषी वैज्ञानिकांनी याच्या पुढे एक पाऊल टाकत आता ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी भाजीपाला वर्गीय नाजूक पिकांमध्ये देखील यशस्वी केली जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. या टेक्निकचा वापर करून कृषी वैज्ञानिकांनी एकाच झाडाला टोमॅटो आणि बटाटे उत्पादित केले आहेत. यामुळे निश्चितच भारतीय शेती हायटेक बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली आहे.
काय आहे ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी
हे एक असे शेतीचे तंत्र आहे, ज्याचा जास्तीत जास्त फायदा अल्पभूधारक शेतकरी आणि किचन गार्डन करणाऱ्या शेतकरी बांधवांना होणार असल्याचा दावा केला जात आहे. खरं तर, भारतीय भाजीपाला संशोधन केंद्र वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी कलमी तंत्राद्वारे अर्थात ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर करत देशात प्रथमच भाजीपाला पिकवण्यात यश मिळविले आहे.
या तंत्राद्वारे अशी वनस्पती विकसित करण्यात आली आहे ज्यामध्ये बटाटा आणि टोमॅटो, वांगी आणि मिरची एकाच वेळी तयार केली जाऊ शकतात. त्याला पोमॅटो आणि ब्रिमेटो असे नाव देण्यात आले आहे. या तंत्राद्वारे एकाच रोपातून दोन प्रकारच्या भाजीपाला छोट्या ठिकाणी किंवा कुंडीत पिकवता येतो.
इतर भाज्या विकसित करण्यासाठी देखील संशोधन सुरु
कृषी शास्त्रज्ञ सुदर्शन कुमार मौर्य स्पष्ट करतात की, टोमॅटो आणि बटाटा एकाच वनस्पतीमध्ये कलम तंत्राचा वापर करून लागवड करता येते. त्याला पोमॅटो असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय भाजीपाला संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी अशी रोपे विकसित केली आहेत जी जास्त पाण्यातही वाया जाणार नाहीत.
त्याच वेळी, ते देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या हवामान परिस्थितीत जास्त उत्पादन देऊ शकतात. या अंतर्गत शास्त्रज्ञांनी टोमॅटोची अशी विविधता विकसित केली आहे जी कमी पाण्यात किंवा जास्त पाण्याच्या स्थितीत तग धरू शकते.
याला म्हणतात यश! शेतीत केला एक बदल अन आता वर्षाला कमवतोय 10 करोड; जाणुन घ्या हा भन्नाट प्रयोग
टोमॅटो आणि बटाटा ग्राफ्टिंग कसे करतात
टोमॅटो आणि बटाटे एकत्र वाढवण्यासाठी, बटाट्याचे रोप जमिनीच्या सहा इंच वरपासून कलम केले जाते. कलम करण्यासाठी झाडे आणि देठांची लांबी सारखीच असावी. कलम केल्यानंतर 20 दिवसांनी दोन्ही झाडे जोडली जातात आणि ती शेतात लावली जातात. लावणीनंतर दोन आठवड्यांनी टोमॅटोची काढणी सुरू करता येते. मग जेव्हा टोमॅटोची रोपे सुकतात, त्यानंतर तुम्ही बटाटे देखील काढणी करू शकता. अगदी याचंप्रमाणे वांगी आणि टोमॅटोची कलमे केली जातात.
Share your comments