1. सरकारी योजना

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' सरकारी योजनेमध्ये 95 रुपये गुंतवणूक करा आणि मिळवा तब्बल 14 लाख; वाचा याविषयी

या महागाईच्या युगात बचत करणे फार महत्त्वाचे आहे. कारण काही काळानंतर कमाई कमी होईल, त्यानंतर तुम्हाला पैशांची गरज भासेल. तुम्हीही छोटी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही आपणांस एका भन्नाट सरकारी योजना विषयी माहिती देणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना

ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना

या महागाईच्या युगात बचत करणे फार महत्त्वाचे आहे. कारण काही काळानंतर कमाई कमी होईल, त्यानंतर तुम्हाला पैशांची गरज भासेल. तुम्हीही छोटी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही आपणांस एका भन्नाट सरकारी योजना विषयी माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत, ही योजना सुरक्षित असून चांगला परतावा देणारी आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या योजनेअंतर्गत, तुम्हाला फक्त 95 रुपयांच्या गुंतवणुकीवर 14 लाख रुपयांचा मोठा निधी मिळणार आहे. 

यामुळे निश्चितचं भविष्यात तुम्हाला पैशाची चिंता करावी लागणार नाही. तसेच म्हातारपण सहज कापले जाईल. ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना विशेषत: अल्प गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

एवढेच नाही तर या गुंतवणुकिसाठी जोखीम देखील नाही. कारण पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजना पूर्णपणे जोखीममुक्त असतात.

मैच्योरिटीला मिळतील 14 लाख 

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या योजनेत एका व्यक्तीला दररोज फक्त 95 रुपये जमा करावे लागतील. यानंतर, कालावधी पूर्ण झाल्यावर त्याला 14 लाख रुपये मिळतात. 

विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे विमाधारकाला जगण्यावर लाभ मिळतो. म्हणजेच मनी बॅक योजनेचा लाभही या योजनेत उपलब्ध आहे.

मनी बँकेचा सरळ अर्थ असा आहे की गुंतवलेले सर्व पैसे परत मिळतील. मित्रांनो भारतीय पोस्टल सेवेच्या ग्राम सुमंगल योजनेमध्ये, विमाधारकाला परिपक्वतेवर बोनस देखील दिला जातो.

हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेत 15 आणि 20 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. यामध्ये पॉलिसीधारकाचे वय निश्चित करण्यात आले असले तरी केवळ 19 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तीच या योजनेत गुंतवणूक करू शकतात. 

भारतातील प्रत्येक नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 14 लाख रुपये मिळतील.

English Summary: Post Office Scheme: Invest Rs 95 in Post Office 'Ya' Government Scheme and get Rs 14 Lakh; Read about it Published on: 12 May 2022, 11:06 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters