राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती करून मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीची शिफारस केली होती. असे असताना मात्र राज्यपालांनी ती नावे मंजूर केली नाहीत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी यासाठी राज्यपालांच्या अनेकदा भेटी घेतल्या. मात्र तरीही सदस्य नियुक्तीच्या यादीची फाईल पुढे सरकली नाही. असे असताना आता शिंदे-फडणवीस सरकारची राज्यपाल नियुक्त १२ नावांची संभाव्य यादी समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक भाजप नेते आपले नाव या यादीत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये शिंदे गटातील रामदास कदम, विजय बापु शिवतारे, आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ, अर्जुन खोतकर, नरेश मस्के, चंद्रकांत रघुवंशी अशी नावे आहेत. शिंदे गटाला ६ जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता कोणाची वर्णी लागणार हे लवकरच समजेल.
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ड्रायव्हर..
तसेच भाजपकडून हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, पंकजा मुंडे, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांची नावे चर्चेत आहेत. यामुळे याची चर्चेत आहेत. यामुळे आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता.
ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड
महाविकास आघाडीकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी, एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आनंद शिंदे, रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांचा समावेश होता. यातील काहीजण आता विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
Milk FRP; दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी किसान सभा होणार आक्रमक, घेतला मोठा निर्णय
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, आणि विद्यार्थी लटकून नदी पार करत आहेत
'दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु आणि 4 किलो मटण खाणारा गद्दार आमदार'
Share your comments