1. बातम्या

किसानपुत्रांनी पाळला काळा दिवस, घरावर काळे झेंडे लावून केला सरकारचा निषेध

किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं आज पुण्यात पदयात्रा काढली जात आहे. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यात आला. शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त काळे ध्वज घेऊन ही पदयात्रा काढली जात आहे. यामध्ये किसान पुत्रांसोबत महाराष्ट्रातील स्वतंत्रतावादी शेतकरी नेते आणि चांदवड येथील शेतकरी सहभागी झाले आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Kisanputra observed black day

Kisanputra observed black day

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. यामुळे त्यांचा अडचणीत वाढ होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं आज पुण्यात पदयात्रा काढली जात आहे. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यात आला. शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त काळे ध्वज घेऊन ही पदयात्रा काढली जात आहे. यामध्ये किसान पुत्रांसोबत महाराष्ट्रातील स्वतंत्रतावादी शेतकरी नेते आणि चांदवड येथील शेतकरी सहभागी झाले आहेत.

आज परिशितात 284 कायदे आहेत व त्यातील 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. हे सर्व कायदे नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या नैसर्गिक हक्काचे उल्लंघन करणारे आहेत. न्यायालयांनी त्यांना केव्हाच बाद केले असते, पण परिशिष्ट 9 ने त्यावर न्यायबंदी लादल्यामुळं ते टिकून राहिले आहे. त्यामुळं शेतकरी देशोधडीला लागले आहेत. यामुळे शेतकरी अनेकदा अडचणीत आले आहेत.

तसेच देशात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. देश दुबळा झाल्याचे किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी सांगितले आहे. या पदयात्रेला बालगंधर्व मंदिरापासून या पद यात्रेला सुरुवात झाली आहे. या समारोप महात्मा फुले वाड्यात होणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देखील शेतकरी गुलाम आहेत, असा दावा किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं करण्यात आला आहे.

भूसंपादन केलेल्या जमिनीवर सरकारचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

शेतकाऱ्यांना गळफास ठरलेले कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात येत आहे. यावेळी शेतकरी नेते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, ललित बहाळे, माजी अध्यक्ष अनिल घनवट, विचारवंत विनय हर्डीकर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे विष्णुपंत भुतेकर (वाशीम), लिबर्टी लीगचे मकरंद डोईजड, किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या;
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजरी पिकाचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार
सिंचन उपकरणांमुळे पाणी आणि पैसा दोन्हीची बचत होणार, शासनाकडून 90% अनुदान
तरुणांनो नोकरीत पैसे मिळत नसतील तर सुरु करा अ‍ॅग्रीकल्चर स्टार्टअप, सरकार देणार २५ लाख रुपये

English Summary: Kisanputra observed Black Day, protested the government by putting black flags on the house Published on: 18 June 2022, 02:22 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters