1. बातम्या

विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो

जगभरातील शात्रज्ञ, ज्योतीषी, विचारवंत, वैज्ञानिक आणि प्रत्येकच घटनेवर चर्चा करणारे तज्ञ मंडळी या सगळ्यांना नजीकच्या भविष्यात पृथ्वीच्या नष्ट होण्याची जरा जास्तच काळजी वाटते आहे. अनेक पुरावे, दाखले, पूर्वी नष्ट झालेली माया संस्कृती, नोस्त्रदामची भविष्यवाणी, अधूनमधून जगभर घडणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, या सगळ्या घटनांचा दाखला ही मंडळी पुढे करतात. सगळे टीव्ही चैनल्स प्रलय, भूकंप, ज्वालामुखी यावर आधारित सिनेमांच्या क्लिप्स दिवसभर दाखवत तज्ञांची चर्चासत्रे आयोजित करतात.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
earth

earth

जगभरातील शात्रज्ञ, ज्योतीषी, विचारवंत, वैज्ञानिक आणि प्रत्येकच घटनेवर चर्चा करणारे तज्ञ मंडळी या सगळ्यांना नजीकच्या भविष्यात पृथ्वीच्या नष्ट होण्याची जरा जास्तच काळजी वाटते आहे. अनेक पुरावे, दाखले, पूर्वी नष्ट झालेली माया संस्कृती, नोस्त्रदामची भविष्यवाणी, अधूनमधून जगभर घडणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, या सगळ्या घटनांचा दाखला ही मंडळी पुढे करतात. सगळे टीव्ही चैनल्स प्रलय, भूकंप, ज्वालामुखी यावर आधारित सिनेमांच्या क्लिप्स दिवसभर दाखवत तज्ञांची चर्चासत्रे आयोजित करतात.

वृत्तपत्रातून हे काल्पनिक चित्रण रंगवले जाते, जनता भयभीत होते, रक्तदाब वाढतो, चिंता वाढते, आणि उद्याची शाश्वती नसल्याने आज जास्तीतजास्त भोगवादी बना, मजा करा, चंगळ करा, ही मानसिकता वाढीस लागते. विज्ञानाने जी प्रगती साधली ती एका झटक्यात नष्ट होईल कि काय हा एक भयगंड सध्या थैमान घालतो आहे. बुद्धीवादि घटकांना जडलेला हा मानसिक विकार आहे. ब्रम्हांडाची रचना अद्भूद संरक्षित आहे. अनेक आकाशगंगा, त्यात अगणित तारे, त्यांचे ग्रह, उपग्रह, कृष्णविवरे, याशिवाय आपल्याला माहिती नसलेल्या अगणित गोष्टी हे सगळ संतुलित आहे.

अंतर आणि वेगात संतुलित बांधलेले आहे, नियंत्रित सुद्धा आहे. या सगळ्या पसाऱ्यात आपली छानशी पृथ्वी चुंबकीय प्रभावाच्या अदृश्य धाग्यांनी संतुलित आहे. पृथ्वीच्या उगमापासून अनेक स्थित्यंतरे घडून गेली आहेत. नैसर्गिक कारणांनी विविध ठिकाणी विविध वेळी भूपृष्ठावर नित्य बदल झालेले आहेत, होत आहेत आणि पुढेही होत राहणार आहेत. भूगर्भातील सूक्ष्म वेगाने सरकणारे महाकाय खडक (प्लेट्स) नित्य बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात. हे सर्व बदल घडत असतांना त्या त्या वेळेची जीवसंस्कृती फक्त नष्ट होते.

त्या भूभागापुरताच हा विनाश असतो. कालांतराने पुन्हा उपलब्ध पर्यावरणाला साजेसे, मान्य असणारे नवीन जीव उत्पन्न होतात. पुन्हा कधीतरी नष्ट होईपर्यंत ही जीवसंस्कृती फुलते, खुलते. हे निसर्गाचे बदल मान्य असतांना आत्ताच जगबुडीची भीती का ? याचे कारण म्हणजे प्रचंड विध्वंसक क्षमता असलेले आजच्या युगातील मानवाने निर्माण केलेले ब्रम्हास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब. स्वतः ला समर्थ समजणारी अण्वस्त्रधारी राष्ट्रे जेंव्हा अणुयुद्धाची दुर्दैवी चूक करतील तेंव्हा मानव निर्मित आपत्ती आपले रौद्रस्वरूप दाखवेल. स्वतः सकट संपूर्ण जीवसृष्टीला नष्ट करण्याच सामर्थ्य या आपत्तीत आहे.

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकार देणार पैसे, मजूर टंचाई आणि फसवणुकीवर निघणार तोडगा..

मानवातील आपसातील इर्षा, सत्ताकांक्षा व आत्यंतिक द्वेष याची परिणीती एकमेकांवर कुरघोडी करून बेचिराख करून नष्ट करण्यातच होणार हे निश्चित. समजलेले आणि मान्य असलेलं हे स्वतःचं भविष्य कितीही भयभीत करीत असले तरी आता काय उपयोग ? आपणच निर्माण केलेला #अण्वस्त्ररुपी #भस्मासुर मान्य असला तरीही विनाशाचं खापर ब्रम्हांण्डातील ग्रहतार्यांच्या टक्कर होण्यावर फोडले जात आहे.

ब्रम्हांड संतुलित व सुनियंत्रित आहे, अण्वस्त्रांच्या स्फोटांच्या प्रभावाने सुद्धा पृथ्वीची शकले होणार नसून भूपृष्ठावरील अयोग्य झालेल्या आवरणात असलेली मानवासहित जीवसृष्टी काही प्रमाणात नाहीशी होऊ शकेल.

शेतकऱ्यांनो जैविक खत मातीसाठी अमृत

त्यानंतर जे शिल्लक असेल त्यासहीत आपली पृथ्वी मार्गक्रमण करणारच आहे. विशाल वृक्षाच्या फांदीवर बसून आपणच ती फांदी तोडतो आहोत. अजूनही वेळ गेली नाही. सर्वच राष्ट्रांनी अण्वस्त्रे नष्ट करणे आवश्यक आहे. शस्त्र प्रयोगाने शस्त्र वादाचा अंत होऊ शकत नाही. विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा विनाश होऊ शकतो.
लेखक :
सुहास सोहोनी. अमरावती
फोन : ९४०५३४९३५४

महत्वाच्या बातम्या;
देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार, शेतकऱ्यांना होणार फायदा..
Red Ladyfinger: शेतकऱ्यांनो एकदा लाल भेंडी लावाच, मोठ्या मागणीमुळे मिळतोय जास्तीचा भाव..
एकदा लावले की ४० वर्ष पैसाच पैसा!! बांबू शेती ठरतेय फायदेशीर..

English Summary: It is not the earth that can be destroyed, but the life culture Published on: 16 January 2023, 05:10 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters