1. आरोग्य सल्ला

उपवासाचे वैज्ञानिक रहस्य- उपवासाचे शास्र नैसर्गिक

आठवड्यातून केवळ एक दिवस पुर्ण उपवास केल्याने आपले आजार बरे होतात या गोष्टीवर भरोसा आहे की नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
उपवासाचे वैज्ञानिक रहस्य- उपवासाचे शास्र नैसर्गिक

उपवासाचे वैज्ञानिक रहस्य- उपवासाचे शास्र नैसर्गिक

प्राचीन उपचार पद्धतीआठवड्यातून केवळ एक दिवस पुर्ण उपवास केल्याने आपले आजार बरे होतात या गोष्टीवर भरोसाआहे की नाही.आपल्या शरीरामध्ये दोन असे संप्रेरके (Harmones) आहेत जे एकमेकांच्या विरूद्ध कार्य करतात.१.इन्सुलिन २.ग्लुकॅगॉन हे दोन्ही हार्मोन स्वादुपिंडातून पाझरतात. इन्सुलिन हे साठा करणारे हार्मोन आहे. हे अतिरिक्त पिष्टमय पदार्थांचे चरबीत साठा करून ठेवते. तर ग्लुकॅगॉन अगदी विरुद्ध कार्य करते. ग्लुकॅगॉन जिथे जिथे चरबी असते तिथे जाते व अतिरिक्त चरबीचे पचन करते आणि ऊर्जा/शक्ती निर्माण होते. पण रक्तामध्ये अतिरिक्त इन्सुलिन असताना ग्लुकॅगॉन पाझरत नाही. ग्लुकॅगॉन वाटच पहात असतो कधी एकादशी/चतुर्थी येईल, उपवास येईल. इन्सुलिन ची पातळी शून्य होईल मग मला पाझरता येईल.

परंतु उपवासाच्या दिवशीही आपण पिष्टमय पदार्थच खातो त्यामुळे ग्लुकॅगॉन पाझरतच नाही. सतत पिष्टमय पदार्थ, गोड पदार्थ खात राहिल्यामुळे इन्सुलिन ची पातळी खाली येतच नाही.त्यामुळे वर्षानुवर्षे ग्लुकॅगॉनला काम करायला वावच मिळत नाही. परिणामी वर्षानुवर्षे अनेक प्रयत्न करूनही वजन/चरबी कमी होत नाही. मधुमेह ही नियंत्रणात येत नाही.इन्सुलिनची पातळी कमी करणे व ग्लुकॅगॉनला चरबी पचवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हे खरे रहस्य आहे. इन्सुलिन व ग्लुकॅगॉन हार्मोनचे कार्य संतुलित झाले तर पचन ही संतुलित होईल. भारतात दोन वेळाच लोक पोटभर जेवत होते तोपर्यंत सर्वच आरोग्यदायी होते. ब्रेकफास्ट, चहा, कॉफी आले व ग्लुकॅगॉनला पाझरायला वावच राहिला नाही. संस्कृत शब्दकोशात ब्रेकफास्ट ला पर्यायी शब्दच नाही.

आपले शरीर अतिरिक्त इन्सुलिनसाठी तयारच केलेलं नाही. इन्सुलिनचे काम झाले की रक्तातील इन्सुलिनची पातळी शून्य झाली पाहिजे ह्यासाठी निसर्गाने आपले शरीर बनवलेले आहे. उपवास करतो त्यावेळी ग्लुकॅगॉन पाझरायला संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. विना साखरेचे दूध, ताक, लोणी,तूप, खोबरे,शेंगदाणे, राजगिरा इ. पदार्थ आपण घेऊ शकतो.ह्यामध्ये कमीतकमी पिष्टमय पदार्थ असून प्रथिने व स्निग्धपदार्थ जास्त आहेत. त्यामुळे इन्सुलिन कमीतकमी पाझरेल. पण ते दोन वेळा जेवणातच घ्यावे. मध्ये मध्ये पाणी भरपूर प्यावे. अगदीच वाटले तर पातळ ताक घेऊ शकतो. असे आपण उपवासावेळी करणे आरोग्यदायी आहे. तसेच इतर दिवशीही जेवणामध्येच पिष्टमय पदार्थ चपाती, भाकरी, भात, फळभाज्या, कडधान्ये, सलाड इ. घ्यावे. दोन जेवणांच्या मध्ये चहा, कॉफी, एखादा वरचा खाऊ खाणे टाळावे. म्हणजे इन्सुलिन ची पातळी वाढणार नाही. इन्सुलिन दोनदा जेवणाच्याच वेळी पाझरेल व पचन झाले की त्याची पातळी खाली येईल आणि मग ग्लुकॅगॉन पाझरेल जे अतिरिक्त चरबीचे पचन करेल.

रोजच्या जीवनात दोन वेळाच जेवणे हेही एकप्रकारे उपवासाप्रमाणेच आरोग्यदायी आहे. मध्ये मध्ये काय खावे म्हणजे इन्सुलिन ची पातळी वाढणार नाही ताक (२चमचे दही +२००ml पाणी), नारळ पाणी, हे सेवन करू शकतो. आपण चहा, कॉफी ऐवजी विविध काढेहीघेऊशकतो.जसेधणे+जिरे+दालचिनी+बडीशेप इ.चा काढा. परंतु ज्यांचे फास्टिंग इन्सुलिन व HBA1C जास्त आहे त्यांनी पाणी पिणेच आरोग्यदायी आहे. तसेच दररोज रात्री बारा ते चौदा तास जर आपण अखंड उपाशी राहिलोत तर autophagy ही वैज्ञानिक प्रक्रिया आपल्या शरीरात कार्यरत होईल. ज्या द्वारे डायबिटीस, कँसर, विविध मानसिक आजार आपल्याला होणारच नाहीत.एक धार्मिक विधी म्हणून उपवास आपल्या सांस्कृतीत गोवला असला तरी त्यामध्ये सखोल विज्ञानाच लपलेले आहे.आपल्या ऋषीमुनींना शतशः नमन

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: The Scientific Mystery of Fasting - The Science of Fasting is Natural Published on: 22 June 2022, 01:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters