1. बातम्या

अफगाणिस्तान मध्ये झालेल्या तनावानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात केशराच्या किंमतीवर परिणाम, भारताच्या केशर किमतीत विक्रमी वाढ

किरण भेकणे
किरण भेकणे
Saffron

Saffron

भारताची मान  उंचावेल  अशी  कामगिरी केशर (Saffron) उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात केलेली आहे. भारतात निर्यात(export)  होणाऱ्या  saffron चा दर  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आभाळाला गडाडलेला आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान राजवटमुळे आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फायदा भारतातील केशर उत्पादकांना होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात केशर चे दर प्रति किलो १.४ लाख रुपये आहेत तर सध्याच्या स्थितीला आंतरराष्ट्रीय बाजारात केशर चे दर प्रति किलो २.५ लाख रुपये पर्यंत पोहचले आहेत.

काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सुमारे १२ मेट्रिक टन केशर तयार:

Saffron च्या उत्पादनात आणि निर्यातीच्या बाबतीत पहिल्या नंबर ला भारत देश, दुसऱ्या  नंबर ला इराण  देश आणि तिसऱ्या नंबर ला सर्वात जास्त उत्पादन घेणारा देश (country)म्हणजे अफगाणिस्तान.जम्मू काश्मीर मधील पुलवामा, बडगाम, श्रीनगर आणि किश्तवाड या चार  जिल्ह्यात केशर ची लागवड केली जाते. पुलवामा जिल्ह्यातील पंपोर येथे केशर चे उत्पादन  उत्तम दर्जाचे घेतले जायचे.काश्मीर च्या खोऱ्यामध्ये सुमारे १२ मेट्रिक टन केशर तयार केले जाते ज्याचा उपयोग औषध, परफ्युम तसेच रंग तयार करण्यासाठी केला जातो.

हेही वाचा:जागतिक बाजारपेठेत केशरचा भाव आसमानी थेटला, व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा

2.25 लाख रुपये किलो केशर -

पुलवामा जिल्ह्यातील पंपोर मध्ये केशर उत्पादक शेतकरी आणि व्यापारी वर्गाने असे सांगितले की केशर ची किमंत मागील काही दिवसांपूर्वी १.४ लाख रुपये प्रति किलो आहे. तर सध्याच्या स्थितीला केशर ची किमंत आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति किलो २.२५ लाख रुपये आहे. जर अफगाणिस्तान मधील परिस्थिती लवकर बदलली नाही तर केशर मध्ये अजून किमंत  वाढू  शकते आणि याचाच फायदा भारतातील केशर उत्पादक शेतकरयांना होणार आहे.

भारतामधील उत्पादनातही वाढ:-

मागील काही वर्षांपासून जम्मू काश्मीर मधील केशर च्या उत्पादनात बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे जे या आधी प्रति एकर फक्त १.८ किलो केशर तयार होत होते तर आत्ताच्या स्थितीला पाहायला गेले तर प्रति एकर ४.५ लाख  किलो केशर चे  उत्पादन निघत आहे. काश्मीर  खोऱ्यात  जेवढे उत्पादन घेतले जाते त्यामधील  १०  टक्के  केशर  देशांतर्गत  बाजारपेठेत  वापरले जाते.देशातील केशर ची मागणी अफगाणिस्तान व इराण च्या माध्यमातून केली जाते. अफगाणिस्तान मध्ये केशर च्या उत्पादनात सतत वाढ  होत निघालेली  आहे.अफगाणिस्तान मध्ये २०१० पासून केशर उत्पादन चालू केले आहे जे की जगात तिसऱ्या नंबर ला केशर उत्पादनात अफगाणिस्तान देश आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर तेथील केशर उत्पादन परिस्थिती खालावलेली आहे.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters