1. बातम्या

एकात्मिक शेतीमुळे होतेय पीक उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा

21 व्या शतकात शेतीमध्ये अनेक वेगवेगळे बदल होताना आपल्याला दिसत आहेत. नवनवीन यंत्र प्रणाली, रासायनिक खते यांचा वापर शेतीमध्ये मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळं उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी (farmer) अत्याधुनिक यंत्राचा वापर करत आहेत. यातून शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढलेत परंतु एकात्मिक शेती या पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकरी वर्गाचा सुद्धा सर्वांगिण तसेच आर्थिक विकास सुद्धा झालेला आहे.त्यामुळं आता सगळीकडे एकात्मिक शेती पद्धत शेतकरी वापरत आहेत आणि त्यातून भरघोस उत्पन्न मिळत आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
Integrated agriculture

Integrated agriculture

21 व्या शतकात शेतीमध्ये (farmer)अनेक वेगवेगळे बदल होताना आपल्याला दिसत आहेत.नवनवीन यंत्र प्रणाली,रासायनिक खते यांचा वापर शेतीमध्ये मोठया प्रमाणात होत आहे.त्यामुळं उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी अत्याधुनिक यंत्राचा वापर करत आहेत. यातून शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढलेत परंतु एकात्मिक शेती या पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकरी वर्गाचा सुद्धा सर्वांगिण तसेच आर्थिक विकास सुद्धा झालेला आहे.त्यामुळं आता सगळीकडे एकात्मिक शेती पद्धत शेतकरी वापरत आहेत आणि त्यातून भरघोस उत्पन्न मिळत आहेत.

एकात्मिक शेती म्हणजे नक्की काय:-

एकात्मिक शेती ही वेगवेगळ्या लहान मोठ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली जाते. त्यामुळं एकात्मिक शेती पद्धतीने शेती करून मोठे शेतकरी बक्कळ नफा मिळवत आहेत.एकात्मिक कृषी व्यवस्थेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीच्या प्रत्येक कोपऱ्यातून पीक पिकवणे आणि जमिनीचा योग्य वापर करणे एवढंच  आहे.एकात्मिक शेती पद्धती  मध्ये  वेगवेगळे शेतकरी एकाच वेळी वेगवेगळ्या पिकांचे तसेच फुले, भाज्या, गुरांचे संगोपन,फळउत्पादन,मधमाशीपालन, मत्स्यपालन हे सर्व गोष्टी करू शकतात. या सर्वातून केवळ बक्कळ नफा मिळवणे एवढंच शेतकऱ्याचा उद्देश असतो.एकात्मिक शेती चे उद्देश हे कमी खर्चातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे एवढेच  आहे. एकात्मिक शेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या प्रकारच्या कृषी व्यवस्थेमुळे पर्यावरण सुखरूप राहते तसेच मातीमधील खतशक्तीही वाढवते आणि उत्पादन वाढीस सुरवात होते.

जाणून घ्या, एकात्मिक शेतीचा फायदा काय?

  • एकात्मिक शेती प्रकारचा अवलंब केल्यास शेतीमधून अधिक उत्पन्न मिळते.
  • एकात्मिक शेती पध्दती मुळे शेतकरी वर्ग बक्कळ नफा कमावतात.
  • शेतीच्या कामांचा खर्च हा खूपच कमी असतो.
  • शेताची आणि मातीची खत क्षमता वाढते. आणि उत्पादन वाढीसाठी योग्य जमीन तयार होते.
  • संरचनांचा संपूर्ण वापर होतो.
  • एकात्मिक शेतीमध्ये जोखीम ही खूपच कमी असते.
  • एकात्मिक शेतीमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतात.

जाणून घ्या, एकात्मिक शेती कशी केली जाते:-

झारखंडची राज्यातील राजधानी असलेल्या रांची जिल्ह्यामधील एका गावात सर्वच शेतकरी हे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करत आहेत. हा सर्व शेतकरी वर्ग पाच एकर जमिनीवर  धान्य तसेच फुले आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला यांचे उत्पादन घेत आहेत. शेती बरोबरच येथे मासे शेती, कुक्कुटपालन, शेळी  पालन  आणि  दुग्धव्यवसाय सुद्धा  जोडधंदा  म्हणून   केले जातात. तसेच येथील बडे शेतकरी गरज असलेल्या शेतकरी वर्गाला शेतीविषयक लागणारी अवजारे सुद्धा भाड्याने देत आहेत. यामधून त्यांना चांगले उत्पन्न सुद्धा मिळते आहे. येथील शेतकरी एकात्मिक शेतीचा अवलंब।करतात आणि याबरोबरच जोडधंदा सुद्धा करून आपले उत्पन्न वाढतवत आहेत.एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब केल्यामुळे  येथील  गुरांना  चाऱ्याची  अजिबात कमतरता नाही. तसेच वेगवेगळ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवले जाते त्यामुळं मोठ्या प्रमाणात पैसे वाचतात. एकात्मिक शेती पध्दती चा अवलंब करून आपण सुद्धा दरवर्षी पाच एकरात 8 लाखाचे उत्पन्न सहजपणे मिळवू शकतो.

English Summary: Integrated agriculture leads to increase in crop production and also benefits farmers Published on: 18 October 2021, 02:55 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters