
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री पीकविमा योजना' राबवली होती. मात्र विमा संरक्षण देणाऱ्या विमा कंपन्यांचीच मनमानी चालू असल्याचं उघडीस आलं आहे. तसेच या कंपन्यांचा सरकारच्या धोरणामध्येदेखील हस्तक्षेप वाढला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील हा प्रकार असून याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही मागील वर्षीच्या नुकसानीचा विमा मिळालेला नाही. तसेच शेतकऱ्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील त्यांना विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली जातीये. नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र आपत्कालीन परिस्थितीमुळे उद्धभवणाऱ्या संकटांबाबत शेतकरी जाणून असतात. त्यामुळेच त्यांनी पिकविमा योजनेत सहभाग नोंदवला व सर्व प्रक्रियादेखील पूर्ण केली.
त्यातून ते या योजनेच्या लाभासाठी पात्रही झाले. आणि आता त्यांना पुन्हा यावर्षीच्या खरिपाचा हप्ता भरण्याची वेळ आली आहे. मात्र असं असताना अजूनही शेतकऱ्यांना गत वर्षातील विमा रक्कम मिळाली नाही. 2021 साली, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांतर्गत या योजनेचा परतावा शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही.
एकचं नंबर! आता महाराष्ट्राच्या आंब्याची चव चाखणार जो बायडेन; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
या योजनेसाठी हजारो शेतकरी पात्र आहेत मात्र पात्र असूनही रक्कम मिळत नसल्याने विमा कंपन्यांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सर्वच पिकांचे अमाप नुकसान झाले होते. जिल्ह्यात कापसाची लागवड ही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती.
40 गोणी कांदा, शेतकऱ्याला आडतवाल्यालाच द्यावे लागले 7 रुपये, सांगा कसा जगणार शेतकरी
त्यामुळे भरून न निघणार असं नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे देखील महसूल विभागाकडून करण्यात आले होते. त्यानंतर तलाठींकडून पंचनामा करण्यात आला. लागणारी सर्व कागदपत्रेही जमा केली होती. मात्र तरीदेखील शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
दूध उत्पादन वाढवण्यासाठी अझोला उपयुक्त; लागवड तंत्रज्ञान आणि आश्चर्यजनक फायदे
Share your comments