1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल.

शेती करत असताना कोणत्या वेळेला कोणती पिके घ्यायची हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण योग्य वेळेला योग्य पीक आणि उत्पन्न घेतल्याने भरपूर प्रमाणात नफा आपल्याला मिळू शकतो या लेखामध्ये कोणती पिके केव्हा घ्यायचे हे आपल्याला सांगितले आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल.

शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल.

 दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात.

 महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात.

 १७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा कोरडे जाते, तेव्हा ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्याचे कोथिंबीरीचे प्लॉट करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात.

 जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोप तयार करावे. म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळीत पैसे होतात. ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडीस वर्षभर जैविक औषधे सेंद्रिय खत वापरून आले ले 'न लागलेले आले' गणपतीपासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात.

 सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरून लिंबाला भाव मिळून पैसे होतात.

 द्राक्षाची एप्रिल, ऑक्टोबर छाटणी लवकर घेऊन रमजान व नाताळाला द्राक्ष आखाती राष्ट्र व युरोप राष्ट्रात निर्यात करता येतात. तसेच महिनाभर अगोदर द्राक्ष काढल्यामुळे पाणी, मजुरी, खत, औषधे यांच्यात बचत होते.

 रमजान, नाताळ व इतर सणांसाठी कलिंगड व खरबुजाची लागवड सलग किंवा आंतरपीक (डाळींबात किंवा शेवग्यात) घेतले तर रमजान किंवा नाताळाला देशांतर्गत मार्केटमध्ये निर्यातीस उपलब्ध होतात. हा अनुभव बर्‍याच शेतकऱ्यांनी घेतला आहे.

 गणपती झाल्यानंतर पितृ पंधरावड्यामध्ये विविध प्रकारची भाजी यावी. यासाठी नियोजन करून उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना अल्पावधीत कमी लागवडीत पैसे मिळवता येतात.सप्टेंबर, ऑक्टोबर (भाद्रपद) महिन्यात थंडी सुरू होण्यापूर्वी भेंडी वितभर आपल्या तंत्रज्ञानाने उगवून ऐन थंडीत भेंडीचे हमखास पैसे होतात.

नवरात्रीच्या अगोदर बाजरी, हळवा कांदा अथवा उडीद काढल्यावर गहू करताना गव्हाची लागवड जर्मिनेटर लावून १९ नोव्हेंबरच्या आत करावी व गव्हास लागवडीपासून दर २१ दिवसांनी (२१,४२,६३,८४,१०५,१२६) जसे पाणी उपलब्ध असेल तशा पाळ्या द्याव्यात, परंतु पाळ्या कधीही चुकवू नयेत.४२ व्या दिवशीचे पाणी उपलब्ध नसल्यास ६३ व्या दिवशी द्यावे. ६३ व्या दिवशी नसेल तेव्हा ८४ व्या दिवशी द्यावे आणि १०५ व्या दिवशी हमखास पाणी द्यावे, म्हणजे गव्हात चिक भरतेवेळी हमखास पाणी द्यावे.

 पाण्याची कमतरता असल्यास डाळींबाचा मृग बहार धरावा आणि ह्या बहाराची फळे द्राक्ष व आंबा मार्केटला येण्यापूर्वी (१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी) आणावीत.द्राक्ष शक्यतो लवकर सुरू करून नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये मार्केटला आणून १ जानेवारी ते १५ मार्चपर्यंत संपवून टाकावीत. कुठल्याही परीस्थितीत द्राक्ष, डाळींब हे आंब्याच्या काळात येणार नाही. हे पाहावे.

 स्ट्रॉबेरी देशभर या विज्ञानाने कोठेही येऊ शकते, ती नाताळाला मार्केटमध्ये येईल, हे पहावे तसेच ती फेब्रुवारीपर्यंत चालावी व एप्रिलमध्ये कमी होऊन मे मध्ये जास्त यावी, हे पहावे. म्हणजे मे चे भाव सापडतात.

 सिताफळ गौरी गणपतीत यावीत यासाठी मार्गशिर्षात सिताफळास खांदणी करून सेंद्रिय खत द्यावे व पाणी सोडावे. म्हणजे उन्हाळ्यात फुलगळ होत नाही. पावसाळ्यात सिताफळे काळी पडत नाहीत, डोळे मोठे होतात व दसरा - दिवाळीच्या मंदीत फळे सापडत नाहीत.

 अंजीराचा बहार खट्टा असो वा मिठ्ठा, तो खट्ट्याबहाराच्या फळांनासुध्दा गोडी येऊन बहार चांगला येऊन हमखास पैसे होतात. मिठ्ठा बहाराची फळे फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळून चांगला दर मिळतो. शिवाय पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे बाग न तुटता पाणी, खत व मेहनतीमध्ये बचत होते.

हळवी कांदा किंवा रांगडा कांदा मार्केटल भाव सापडतात. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरला फुरसुंगी हा गेल्यावर्षीचा साठवणीतला कांदा मार्केटला आणला तर दक्षिण भरतातील आंध्र, कर्नाटक, केरळ या राज्यातील मोठ्या शहरात म्हणजेचे बेंगलोर, चेन्नई, तिरूअनंतपुरम, कोईमत्तूर अशा शहरात कांद्याचे भाव चढे (वाढते) राहून हमखास पैसे होतात.

 आंबा (हापूस) एप्रिलच्या अगोदर मार्केटला आणला तर पैसे तर होतातच, परंतु मे महिन्यात अति उष्णतेने जो साका होतो तो हमखास टाळता येतो.

 श्रावण व वैशाखमध्ये कमी पाण्यावर मूग करावा. म्हणजे भाद्रपद महिन्यात व उन्हाळ्यामध्ये हे पैसे वापरता येतात. संत्र्याला बाराही महिने मार्केटला भाव असतो. कमी पाण्याच्या उपलब्धतेत संत्र्याच्या बागा जळत आहेत, कोळशी रोगाने जात आहेत, डायबॅकने खलास होत आहेत. दिंक्याने कोसळत आहेत.

 मिरचीची लागवड अशी करावी की. उन्हाळ्यात (मार्च ते मे) मार्केटमध्ये येईल. या पध्दतीने या तंत्रज्ञानाने करावी. म्हणजे या काळात पैसे होतात. हा देशभरातील शेतकऱ्यांना अनुभव आहे.

 हलक्या, मुरमाड, वरकस, पडीक, मध्यम क्षार असलेल्या जमिनीमध्ये कमी पाण्याच्या उपलब्धतेवर शेवग्याची लागवड करावी.

 केळीची लागवड मृगातली असो अथवा कांदे बागातली असो, ती एरवी १५ ते १८ महिन्यात येते. टिश्यु कल्चरने १२ महिन्यात येते. एप्रिल- मे ते जुलै - ऑगस्ट (चातुर्मासात) आल्याने शेतकऱ्याला त्याच्या मालाचे निश्चित मनासारखे पैसे मिळतात.

रमजान मध्ये पपईची मागणी जास्त असते. ८-९ महिने आधी पपई लावावी.

टोमॅटोची लागवड मार्च, जून आणि डिसेंबरमध्ये पहिल्या पंधरावड्यात करावी, म्हणजे भाव सापडतात.

 काटेरी, भरताची व अंगोरा वांग्याला सर्वसाधारण बाराही महिने भाव असतो. परंतु पावसाळ्यामध्ये शेंडे अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने लागवड करू नये. दुष्काळी भागात पावसाळ्यात लागवड केली तरी चालते. पावसाचे प्रमाण २५ ते ५० इंच आहे तेहते वांगी दसर्‍यानंतर करावीत वांग्याला चांगला दर मिळतो.

कोबीचे फेब्रुवारी ते उन्हाळ्यात चांगले पैसे होतात. त्यासाठी दोन महिने अगोदर रोपे लावून लागवड करावी. कोबीचा गड्डा नारळी आकाराचा, हिरवागार, लांबट, गोल एका चौकोनी कुटुंबास पुरेसा होता. हा गड्डा वजनदार असतो, त्यामुळे एका गड्ड्याच्या दोन वेळेस भाज्या व कोशिंबीर होते. कोबी फेब्रुवारीत काढण्यासाठी दिवाळीत लागवड करावी.

फ्लॉवरला ऑगस्ट, फेब्रुवारी आणि उन्हाळ्यामध्ये मागणी असते. फ्लॉवरचा गड्डा पांढराशुभ्र घट्ट आणि आकार आंब्याच्या झाडाच्या चित्रासारखा गोलसर असावा. वजन ३५० ते ६०० ग्रॅम असावे. अशा गड्ड्यांना भाव जादा मिळतो.

 मार्केटला मंदीची लाट - जूनला अॅडमिशन असतात, त्यामुळे मंदीचा लाट असते. नंतर गणपती ते दिवाळी ही लाट ओसरते, कारण त्यावेळेस लोकांचे बोनस व आलेल्या शेतीमालाचे पैसे मार्केटमध्ये राहतात. दिवाळीनंतर परत मंदीची लाट डिसेंबर नंतर येते ती टॅक्स भरणे, बँकेचे हप्ते भरणे अशा विविध व्यवहारी बाबींमुळे मे पर्यंत टिकून राहते व त्यामुळे मार्केटमध्ये पैशाची उलाढाल कमी होते.

 आठमाही बागायती पाणी साधारण जानेवारी - फेब्रुवारीमध्ये संपते. या काळात भाजीपाला व फळपिकांमध्ये प्रत्यक्षामध्ये तेजी असावयास हवी, तथापि नाही म्हटले तरी मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे व असा भाजीपाला पारंपारिक पध्दतीने केल्याने व सर्व साधारण माणसाची क्रयशक्ती कमी असल्याने पैसे होते नाहीत ही वस्तुस्थिती आहे.यावर मात करण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला, फळे अन्नधान्ये जर निर्माण केले तर ती देशांतर्गत शहरी व निमशहरी मार्केटमध्ये यासाठी प्रचंड वाव आहे. कारण पारंपारिक पध्दतीने पिकवलेल्या शेतीमालापेक्षा नैसर्गिक शेती मालास देशात दुप्पट तर प्रदेशात ४ ते ५ पट भाव मिळू शकतो. नैसर्गिक भाजीपाला पिकवण्यासाठी देशी बियाण्यांचा व रोपांचा वापर झाल्यास तो एक दुग्धशर्करा योग ठरेल.

संकलन - विनोद भोयर मालेगाव

English Summary: When, what, why should farmers plant? That means a lot of benefits. Published on: 11 November 2021, 08:30 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters