1. बातम्या

भारतीय हवामान विभागाने दिली शेतकऱ्यांना महत्वाची सूचना, जुलै महिन्यातील सांगितलं पावसाचा अंदाज

KJ Maharashtra
KJ Maharashtra
rainfall

rainfall


शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाने एक अत्यन्त महत्वाची सूचना दिली असून त्यांनी पावसाचा अंदाज सांगितलं आहे. जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहील असे सांगितले तर जुलै चया दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल असेही हवामान विभागाचे महानीदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी पर्यावरणाचा अंदाज करत सांगितले आहे.

देशातील शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या पेरण्या करण्यामध्ये व्यस्थ आहेत, एका   अंदाजानुसार पाहिला गेले तर  जवळपास २० कोटी  शेतकरी  खरीप हंगामातील पिकांची लागवड करत आहेत जसे की धान, सोयाबीन, कापूस, मका, मूग, भूईमूग, ऊस, उडीद आणि तूर. खरीप हंगामातील पिके ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात, त्यामुळे पाऊस जर सामान्य असेल तर शेतकऱ्यांना कमी खर्च येतो कारण या पिकांना जास्त पाण्याची गरज नसते.जुलै महिन्यात पाऊस सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने लावला  असून  ऑगस्ट महिन्यातील  पावसाचा अंदाज जुलै च्या शेवटी  किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सांगितलं जाईल असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.नैऋत्य मोसमी वारे म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मान्सूनचा पाऊस हरियाणा, पंजाब, दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात तेथील परिस्तिथी अनुकूल नसल्याने पोहचला नाही.

8 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार:

भारतामध्ये यावर्षी मान्सूनचा पाऊस दोन दिवस उशिरा पोहचला आहे परंतु नंतर मान्सूनने वेगाने गती पकडली आहे, अगदी येणाऱ्या आठ ते दहा दिवसात देशातील विविध भागात मान्सूनने आपले आगमन केले. पण लगेच आपला जोर मान्सून ने आवरला. ८ जुलै पासून बंगालच्या खाडीवरून पुन्हा वारे वाहायला सुरू होईल त्यामुळे ८ जुलै नंतर पुन्हा मान्सून दाखल होईल.

30 जून पर्यंतचे राज्यातले पावसाचे चित्र:

हवामान विभागाने ३० जून पर्यंत कोणत्या कोणत्या भागात पाऊस पडला आहे याची नोंद केली आहे त्यामध्ये सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभणी या विभागात सर्वाधिक पाऊस पडल्याचे सांगितले आहे तसेच धुळे आणि नंदुरबार मध्ये खूप कमी पाऊस पडला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर येथे नियमित धरलेल्या  सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची माहिती दिली आहे. तर समाधानकारक पाऊस नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद,  लातूर, नांदेड, हिंगोली,  गडचिरोली, गोंदिया या भागात पडला आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters