प्रतिनीधी - प्रतिक्षा काकडे
१.राज्य शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा होणार फायदा
आता शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे शेतीचे नुकसान टाळता यावे या उद्देशाने सरकारने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय. स्वयंचलित हवामान केंद्राचा एक मुख्य फायदा म्हणजे ते दुर्गम, दुर्गम किंवा धोकादायक ठिकाणी अचूक आणि विश्वासार्ह हवामान डेटा प्रदान करू शकते. यापुढे शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून गावातच हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे. तर शेतकऱ्यांना हवामानाबाबत आश्वस्त करणारा प्रकल्प म्हणून महावेध हा प्रकल्प 2017 सारी अस्तित्वात आला . त्यामुळेच आता 311 गावात हवामान केंद्र होणारेय. याद्वारे तापमान वाऱ्याची दिशा वाऱ्याचा वेग पर्जन्यमान हवामानाचा अंदाज अशी इत्यादी माहिती प्राप्त होत असते. याचा निश्चित च फायदा शेतकऱ्यांना देखील होणार आहे.
२.राज्यात सप्टेंबर मध्ये पावसाची शक्यता
राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला असतांना एक दिलासादायक बातमी समोर आलीय. ऑगस्ट महिना संपला तरी अद्यापही राज्यात पाऊस झालेला नाहीये परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मध्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे शेतकरी अनेक दिवसापासून पावसाची वाट पाहत होता तर कदाचित या होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा, कोकण, गोव्यासह मध्य भारतातील काही भागात पाऊस येण्याची शक्यता आहे. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असुन काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
३.शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन-देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा दिलाय. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन अस ते म्हणालेत. कारण राज्यात ऑगस्ट महिना संपला तरी पावसाने अजुनही पाहीजे तशी हजेरी लावली नाहीये. त्यामुळे पाण्याअभावी शेतकरी वर्ग त्रस्त झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. लातूर जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. काही शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी विहीरीचे पाणी आहे,ते शेतकरी पिकं जगवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र,अशातच महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नाही. शेतकऱ्यांना जर कुठला अधिकारी अडचणीत आणत असेल तर त्याला सस्पेंड करेन. पाऊस पाणी नसतांना पिके सुकून जातय. शेतकऱ्यांनी जगावे कसे हा प्रश्न आहे. या कामांमध्ये जर कोणी हयगय करीत असेल तर तुम्हा सर्वांनाच मी घरी पाठवेन`असा दम फडणवीसांनी फोनवरून अशा इशारा देवेंद्र फडणवीसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलाय..
४.शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा
पावसाअभावी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यातच शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारनं अग्रीम पीक विम्याची घोषणा केलीय. पहिल्या टप्प्यात सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाचा सर्वेक्षण केलं जाणार असुन या तिन्ही पिकांचा एकत्रित सर्व्हे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कापूस तुरीचेही सर्वेक्षण होणार असून शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळणार आहे. त्यामुळं याचा फायदा शेतकऱ्यांना होणारे आहे.
५.व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात
सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी घरगुती गॅसच्या दरात 200रुपयांची कपात केली होती. त्यासोबतच आता घरगुती स्वयंपाकाच्या गॅसनंतर सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केलीय. नवीन दर आजपासून लागू झालाय. 1 सप्टेंबर 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आलीय. 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी एलपीजीच्या किंमतीत 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती. यानंतर दिल्लीत या सिलिंडरची किंमत १५२२ रुपये झाली आहे. इंधन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दर आजपासून लागू करण्यात आलेत. त्यामुळे सणासुदीत सरकारने दिला सर्वसामान्यांना दिलासा दिलाय.
६.नाफेडने केले कांद्याचे दर कमी
नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून दोन लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली होती. कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करताच नाफेड केंद्रावर कांदा खरेदीला सुरुवात झाली. तीन ते साडेतीन हजार रुपये भाव हवा,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र,कांदा चाळीत सडण्यापेक्षा विकलेला बरा, या मानसिकतेतून शेतकऱ्यांनी केंद्रावर नाफेड आणि गर्दी केली.आतापर्यंत साडेसात हजार टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलाय. परंतु गुरुवारी अचानक नाफेडने कांद्याचा दर १३६ रुपयांनी घटविला. २,२७४ रुपये ८३ पैसे दराने कांदा खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झालाय.
Share your comments