1. बातम्या

आयएमडी हवामान अंदाज आता उमंग मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध

नवी दिल्ली: युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) चे उद्घाटन भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी 22 मे, 2020 रोजी केले. यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभाग आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा, राष्ट्रीय इ प्रशासन विभाग एनजीडीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह यावेळी उपस्थितीत होते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


नवी दिल्ली:
युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) चे उद्घाटन भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी 22 मे, 2020 रोजी केले. यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभाग आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा, राष्ट्रीय इ प्रशासन विभाग एनजीडीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह यावेळी उपस्थितीत होते.

शासनाच्या (केंद्र आणि राज्य) विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा म्हणून भारत सरकारने उमंग हे मोबाइल अ‍ॅप सुरु केले असून ते एकसमान, सुरक्षित, विविध वाहिनी आणि विविध मंच असलेले बहुभाषिक अ‍ॅप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नागरिकांच्या मोबाइल फोनवर सरकारी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2017 मध्ये उमंग अ‍ॅप सुरू केले. विविध देयके चुकती करण्यासह 127 विभाग आणि 25 राज्यांमधील जवळपास 660 सेवा या अ‍ॅप वर सुरु असून अधिक प्रस्तावित आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अद्ययावत साधने व तंत्रज्ञानावर आधारित हवामानाचा अंदाज आणि इशारा विषयक सेवांचा प्रसार सुधारण्यासाठी अलिकडच्या वर्षांत विविध उपक्रम राबविले आहेत. हा उपक्रम पुढे वाढविण्यासाठी आयएमडीने डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत “उमंग अ‍ॅप” चा वापर केला आहे.

आयएमडीच्या http://mausam.imd.gov.in संकेतस्थळावरील 7 सेवा उमंग अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.

  • सध्याचे हवामान - चालू तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा अशी 150 शहरांसाठीची माहिती दिवसातील  8 वेळा अद्ययावत केली जाते. सूर्योदय / सूर्यास्त आणि चंद्र उदय / चंद्र सूर्याविषयीही माहिती दिली आहे.
  • अल्पकालीन पूर्व अनुमान - स्थानिक हवामान घटनेविषयी आणि त्याच्या तीव्रतेचा इशारा आयएमडीच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे 800 स्थानके आणि भारतातील जिल्ह्यांसाठी तीन तास आधी  दिला जातो. जर हवामान जास्त प्रतिकूल असेल तर त्या बाबतीत, त्याचा प्रभाव देखील हवामानाच्या इशाऱ्यात दिला जातो.
  • शहराचा अंदाज - भारतातील सुमारे 450 शहरांमधील मागील 24 तास आणि 7 दिवसाच्या हवामानाचा अंदाज दिला जातो.
  • पर्जन्यवृष्टीची माहिती - देशभरातील सर्व जिल्ह्यातील पावसाची माहिती दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि संचयी मालिकेत उपलब्ध आहे.
  • पर्यटनाचा अंदाज - भारतातील जवळपास 100 पर्यटन स्थळांची मागील 24 तासातील आणि 7 दिवसातील हवामानाचा अंदाज वर्तविला जातो.
  • हवामानाचा इशारा - धोकादायक हवामानाविषयी नागरिकांना जागरूक करण्यासाठी इशारा दिला जातो. हवामानाच्या विविध धोकादायक पातळ्या दर्शविण्यासाठी  लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगांचा वापर यासाठी करण्यात येतो ज्यात लाल रंग हा सर्वात धोकादायक परिस्थिती दर्शविण्यासाठी म्हणून वापरतात. आगामी पाच दिवसांसाठी अशी माहिती सर्व जिल्ह्यांत दिवसातून दोनदा जारी केली जाते.
  • चक्रीवादळ - चक्रीवादळाचा इशारा आणि सतर्कता यामुळे चक्रीवादळाचा मागोवा घेता येतो तसेच संभाव्य वेळ आणि किनारपट्टीच्या ओलांडण्याचा कालावधीही कळतो. प्रभाव आधारित इशारा, क्षेत्र/जिल्हानिहाय जारी केले जातो जेणेकरून असुरक्षित क्षेत्र रिकामे करण्यासह योग्य तयारी करता येते.

अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध आहे

 

English Summary: IMD Weather Forecast is now available on the Umang mobile app Published on: 23 May 2020, 08:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters