1. बातम्या

एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मिळतील ९ लाख रुपये

KJ Maharashtra
KJ Maharashtra
एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी

एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी

एलआयसी विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. विश्वास आणि एलआयसी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एलआयसीने सर्वसामान्यांसाठी परवडतील असे वेगवेगळे प्लान बाजारात आणले आहेत. त्यापैकी एलआयसीचा अशाच एका प्लॅन बद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.

प्लॅनचे नाव- जीवन आनंद पॉलिसी

 एलआयसीची ही फारच लोकप्रिय अशी योजना आहे. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे तुम्ही लहान स्वरूपातली गुंतवणूक करून एक मोठा फंड मिळू शकतात. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कुटुंबाचे भविष्याचे रक्षण करू शकता. समजा पॉलिसी चालू असताना तुमचे काही झाले तर तुमच्या कुटुंबाला बाकीचे हत्ती देण्याची गरज राहत नाही.

हेही वाचा : एलआयसीची जीवन अक्षय योजना- एक हप्ता जमा करा आणि जीवनभर चार हजार रुपये पेन्शन मिळवा

या पॉलिसीच्या आर्थिक गणित

उदाहरणच द्यायचे झाले तर तुमचे वय ३५ वर्ष असेल आणि तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी पॉलिसी घेतली तर पाच लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसह तुम्ही २० वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली असेल. तर  त्याआधारे तुमचा वार्षिक हप्ता बसतो ३० हजार २७३ रुपये. जर मासिक तत्त्वावर आत्ता घेतला तर तो येतो  दोन हजार ५२२ रुपये.

३५ वर्षे वय व २० वर्षासाठीची पॉलिसी घेतली तर तुमचे ५ लाख रुपये जमा होतात. त्याबदल्यात तुम्हाला २२ हजार ५०० रुपयांचे विस हप्ते मिळतील. म्हणजे ४ लाख ५० हजार रुपये मिळतील. त्यानंतर या पॉलिसीवर १० हजार रुपयांचा ॲडिशनल बेनिफिट दिला जातो. हा पकडून तुम्हाला ४ लाख ६० हजार रुपये अतिरिक्त मिळतील. या सगळ्यांचा विचार केला तर तुमची जमा होणारी २० वर्षातील मूळ रक्कम ५ लाख रुपये आणि तुम्हाला एकूण मिळणारी रक्कम ९ लाख ६० हजार रुपये होते. त्यामुळे हे आर्थिक गणित फार फायद्याचे आहे.

पॉलिसी घेतल्यावर मिळणारे फायदे

  • तुम्हाला तुमच्या विम्याच्या एकूण रकमेवर ४५/१००० ज्या प्रमाणात रिव्हर्स बोनस मिळेल.

  • म्हणजेच प्रत्येक वर्षी आपल्याला बोनस म्हणून २२ हजार ५०० रुपये मिळतील.

  • बोनस दर बदलू शकतो.

  • याशिवाय तुम्हाला १० हजार रुपयांचा अतिरिक्त अंतिम बोनस मिळतो.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters