दहीवडी, सातारा जिल्ह्यात सध्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. बोराटवाडी येथे आयोजित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, 'आमदार जयकुमार गोरेंनी १३ वर्षांत माण-खटाव मतदारसंघाचा कायापालट केला. त्यांनी उरमोडीच्या दोनशे किलोमीटर लांबीच्या कालव्याची रेष मारली. त्यांनी दुष्काळी मातीला पाणी द्यायचे मोठे काम केले आहे.
विरोधकांनी त्यापेक्षा मोठी रेष मारायची हिम्मत दाखवावी. जयाभाऊ शब्द पाळणारे नेते आहेत. टेंभूचे पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा आणि पूल उडवून देऊ, निवडणुका आल्या की राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात. आताही तसेच षडयंत्र रचले गेले आहे. लवकरच आमचा कार्यकाळ सुरू होणार आहे. असा इशाराच खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.
यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. ते म्हणाले, पाणीप्रश्न इतर इतर विकासकामांसाठी थेट पंतप्रधान मोदींकडून निधी आणणारे आमचे नेतृत्व सर्व बाजूंनी सक्षम आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. भाजपच्या केंद्रातील योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला अनेक लाभ मिळत आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, भगवानराव गोरे, अर्जुन काळे, धनाजी जाधव, अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे उपस्थित होते.
अतिरिक्त उसाबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत, पुण्यात साखर परिषदेचे आयोजन
सातारा जिल्हा हा अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो, पाण्यासाठी अनेक ठिकाणच्या जमिनी ओसाड पडल्या आहेत. यामुळे शेतकरी अनेकदा अडचणींचा सामना करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पाणी गरजेचे आहे. यामुळे पाण्यावरून शेतकरी आणि राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात अनेक धरणे असताना पाण्याचा प्रश्न कायम आहे.
महत्वाच्या बातम्या;
कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? सदाभाऊ खोत यांचा घणाघात
कोरोना वाढल्याने शाळा पुन्हा बंद? वर्षा गायकवाड यांचे मोठे वक्तव्य..
शेतकऱ्यांनो पिकलेल्या शेतमालावर विक्री आधीच घ्या कोट्यावधींचे कर्ज अन् शेतीमालही सुरक्षित
Share your comments