1. बातम्या

सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे? डाळ, तांदूळ दरात होणार वाढ

सध्या देशात महागाईचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टींचे भाव वाढल्याने महिलांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. अशातच आता अजून एक महागाईचा झटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
भात आणि तुरीच्या लागवडीत मोठी घट

भात आणि तुरीच्या लागवडीत मोठी घट


सध्या देशात महागाईचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टींचे भाव वाढल्याने महिलांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. अशातच आता अजून एक महागाईचा झटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. नुकतीच कृषी मंत्रालयाद्वारे डाळ आणि तांदळाबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

यंदा भात आणि तुरीच्या लागवडीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १५ जुलैपर्यंत धानची लागवड ही १७.४ टक्क्यांनी कमी झाली आहे. यंदा रशिया- युक्रेन युद्धामुळे बऱ्याच वस्तूंचे भाव वाढले मात्र यात तांदूळ आणि डाळ यांचे भाव स्थिर होते. परंतु लागवडीत मोठी घट झाल्याने तुरीच्या डाळीचे आणि तांदळाचे दर वाढू शकतात. असं या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांत तर धानाची लागवड ही जवळपास ३१ टक्क्यांनी घटली आहे. तर तुरीच्या लागवडीतही आतापर्यंत २६ टक्के घट झाली आहे. जर डाळ आणि तांदळाचे भाव वाढले तर सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

आता मोदींच्या २ हजारासाठी चुकीची माहिती दिली असेल तर होणार शिक्षा, जाणून घ्या..

सरकारी खरेदीतही घट
२०२१-२२ मध्ये धानाची सरकारी खरेदीतसुद्धा घट झाली आहे. या वर्षीच्या रबी हंगामात ४४ लाख टन धान खरेदी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धानाची सरकारी खरेदी फार कमी झाली आहे. २०२०-२१ मध्ये ६६ लाख टन आणि २०१९-२० मध्ये ८० लाख टन धान खरेदी झाली. तर २०२०-२१ मध्ये एकूण धान खरेदी १३५ लाख टन इतकी झाली होती.

महत्वाच्या बातम्या:
आता काही दिवस पावसाची विश्रांती! 'या' तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, पंजाबरावांनी व्यक्त केला अंदाज...
ब्रेकिंग! रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती

English Summary: How should the common people live? There will be a big increase in the price of dal, rice Published on: 20 July 2022, 03:23 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters