1. बातम्या

शेती करावी तरी कशी?; कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यानं केला कांद्याचा अंत्यविधी

अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार नाही. या पावसानं शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात गारपीटही मोठ्या प्रमाणात झाल्यानं शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत उद्धवस्त झाली आहेत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
शेतकऱ्याने शेती करावी तरी कशी?     ( image credit -  'शेतकरी'  - facebook page )

शेतकऱ्याने शेती करावी तरी कशी? ( image credit - 'शेतकरी' - facebook page )

अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार नाही. या पावसानं शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात गारपीटही मोठ्या प्रमाणात झाल्यानं शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत उद्धवस्त झाली आहेत. आधीच कापूस, कांदा या पिकांना बाजारात कवडीमोल भाव मिळतोय. त्यात अवकाळीचा तडाखा बसल्याने कांदा सडू लागला आहे.

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा
नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. आणि यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळं कांदा पीक सडू लागला आहे. यातून कांद्याचा दर्जा घसरल्याने बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा साधा उत्पन्नाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

कांद्याचा अंत्यविधी
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील शेतकऱ्याने थेट कांद्याचाच अंत्यसंस्कार केला आहे. योगेश सोनवणे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. आधीच कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळतोय. त्यात अवकाळीच्या तडाख्यात कांदा पीक सापडल्याने बाजारात त्या कांद्याला कोणी बोलीसुद्धा लावत नाही. आणि बोली लागली तरी कवडीमोल भावाचीचं लागत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.

हताश होऊन योगेश सोनवणे या शेतकऱ्याने शेतातील कांद्याचा अंत्यविधी केला. तसेच कांदा ट्रॅक्टरने पसरवून नष्ट करत आपला संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या राज्यात गारपिटीमुळे इतर अनेक पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी आता नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत कधी पोहचणार? राज्य सरकार कोणकोणत्या उपाययोजना आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अधिक बातम्या:
शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका संपेना; अवकाळीने सोन्यासारखी पिके उद्धवस्त केली
पीएम किसान संदर्भात कृषीमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, 14 व्या हप्त्यापूर्वी आले हे अपडेट!
1 मे पासून हे चार मोठे बदल होत आहेत, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार, वाचा सविस्तर...

English Summary: How should a farmer cultivate?; As the price of onion fell, the farmer performed the last rites of onion Published on: 01 May 2023, 03:49 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters