1. बातम्या

Climate Change Update : बेभरवशाच्या हवामानावर राज्याचे एकूण किती क्षेत्रफळ अवलंबून?

बेभरवशाच्या हवामानावर (पाऊसावर) राज्याचे एकूण क्षेत्रफळांपैकी कोरडवाहू असलेले 84 ते 86 टक्के अवलंबून आहे. एकंदर पाऊसाच्या लहरी वितरणावर ही कोरडवाहू शेती आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Climate Change Update

Climate Change Update

सोमिनाथ घोळवे

Weather Update : हवामान बदलामुळे पाऊस वितरणात टोकाची अनिश्चित अनुभवत आहोत की आपण समजून घेण्यास कमी पडत आहोत?. हवामान समजून घेण्यासाठी आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञान आणि विश्लेषण पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे का? असे अनेक प्रश्न चालू दुष्काळी स्थितीच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत.

हवामान बदलाविषयीचा अंदाज घेण्याविषयी जेवढे भूतकाळाचे ज्ञान असेल, तेवढे आकलन चांगले होते. आपल्याला कमीत कमी गेल्या 1 हजार वर्षाच्या काळात हवामान बदल काय होत आले आहेत. ह्याचा बारकाईने तपशील माहीत असणे आवश्यक आहे. जर हे माहीत असेल तर सद्यस्थिती आणि पुढील काही काळासाठी (शतकासाठी) महत्वाचा राहील.
1850 पासूनचे हवामानाचे इन्स्ट्रुमेंटल रेकॉर्ड उपलब्ध आहेत. तर युरोपमध्ये 1750 पासूनचे हवामानाचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत. पूर्वी हवामानाचे नोंदीचे इन्स्ट्रुमेंटल उपलब्ध नसल्याने रेकॉर्ड मिळत नाहीत. मात्र त्या काळात हवामानाची माहिती ही वृक्षांच्या बुंध्यातील कडी, सागरी तळाचा गाळ, बर्फ साठयाचे केंद्र, नद्यांचा प्रवाह या निसर्गाच्या अभ्यासातून मिळतात. याचा अभ्यास जर तपशीलवार आणि काळजीपूर्वकरित्या विश्लेषण करून केला तर गतकाळातील हवामानाचा अंदाज घेता येणे शक्य आहे.

अलीकडे सातत्याने हवामान बदलामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, टोकाचे वाढलेले तापमान आणि पाऊसाची अनिश्चितता अनुभवत आहोत. ह्या हवामान बदलाची नेमकी करणे समजून घेऊन, उपाययोजना करावयाच्या झाल्या तर किमान आपल्याला पर्जन्यमान कसे राहिले होते आणि नदीच्या प्रवाहाच्या दीर्घकालीन नोंदी काय आहेत हे समजून घ्यावे लागते. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात हवामान बदल होत असल्याने काय प्रकारचा परिणाम झालेला होत आहे, होऊ लागला आहे हे तपासणे गरजेचे बनले आहे. या संदर्भात अभ्यासाचे मॉडेल कोणते वापरले गेले आहेत, त्यास पर्याय मॉडेल काही असू शकतील का हे पाहावे लागते. याशिवाय पूर्वीचा हवामान नोंदीचा डेटा काय दर्शवतो. त्याचे अचूक विश्लेषण असणे अवश्यक आहे.

बेभरवशाच्या हवामानावर (पाऊसावर) राज्याचे एकूण क्षेत्रफळांपैकी कोरडवाहू असलेले 84 ते 86 टक्के अवलंबून आहे. एकंदर पाऊसाच्या लहरी वितरणावर ही कोरडवाहू शेती आहे. मात्र हवामान अंदाज देणाऱ्यांकडून नेहमीच फसवा अंदाज येताना दिसून येतात. अर्थात देशाचे क्षेत्रफळ आणि हवामान अंदाज देण्याचे सूत्र यांच्यात ताळमेळ अनेकदा राहिलेला नाही. कोठेतरी हवामानाचा अंदाज घेण्यास आपण कमी पडत आहोत का? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो.

जर कमी पडत नसलो तर विश्लेषण आणि तंत्रज्ञान यात कोठेतरी गडबड होत आहे का? जर असेही नसेल तर पाऊसाचे अंदाज घेणारे काळजीपूर्वक ह्या बाबी समजून घेत नाहीत का? असे अनेक प्रश्न आहेत. हे सर्व असले तरी पाऊसाचा आगमन आणि पडणाऱ्या पाऊसाचे वितरण याचा अंदाज येत नसल्याने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात टिकून राहणे कठीण होत चालले आहे.

कारण शेतीतील गुंतवणूकीचा खर्च कसा मिळवायचा हा मोठा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस वितरण होणारी वाटचाल पहाता जिल्हानिहाय- तालुकानिहाय अंदाज मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून पीक पॅटर्नमध्ये शाश्वती आणता येईल. मात्र विभागनिहाय अंदाज दर्शविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करण्याचा अंदाज येत नाही. परिणामी आपत्तीच्या चक्रव्यूहात शेतकरी सापडतात.

(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)

English Summary: How much total area of ​​the state depends on Climate Change Published on: 05 September 2023, 10:43 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters