देशात मागील बऱ्याच महिन्यांपासून थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रभाव पसरत असतानाच अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूने डोकेवर काढले आहे. पूर्ण देशाचा विचार केला तर गेल्या दहा दिवसांमध्ये जवळ-जवळ चार लाखांपेक्षा जास्त पक्षांचा मृत्यू झाला आहे.केंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये बर्ड फ्लूला अधिकृत दुजोरा दिला गेला आहे
यासाठी उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने दिल्लीत मध्यवर्ती कक्ष स्थापन करून तो कक्ष इतर राज्यांच्या संपर्कात राहणार असल्याचे सांगितले आहे.. मध्यप्रदेश राज्याचा विचार केला तर मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी बर्ड फ्लूच्या संदर्भात बुधवारी तातडीची बैठक बोलावली होती. दक्षिण भारतातील बऱ्याच राज्यांनी पोल्ट्री व्यवसायावर काही दिवसांसाठी निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान, तसेच हिमाचल प्रदेशातील पौंग धरण परिसर अभयारण्यात आढळलेले मृत पक्षी बर्ड फ्लूमुळे दगावल्याची समोर आले आहे. हरियाणामध्ये जवळ-जवळ चार लाखांहून जास्त कोंबड्या मृत्युमुखी पडले आहेत.
हेही वाचा :बर्ड फ्लूमुळे अस्वस्थ पोल्ट्री व्यावसायिक, दररोज कोट्यावधी अंडी आणि कोंबडीची उलाढाल
कसा पसरतो बर्ड फ्लू? How does bird flu spread?
एखादा व्यक्ती बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्षाच्या संपर्कात आल्याने त्याला या आजाराची लागण होऊ शकते. संसर्ग झालेला पक्षी, त्याचे पंख किंवा त्याच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यानंही बर्ड फ्यूचा मानवाला संसर्ग होऊ शकतो. या आजाराचा सर्वाधिक धोका आजारी पक्षांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना अधिक आहे.
जगभरात अनेक पोल्ट्री फर्म आहेत. अशा ठिकाणी दररोज पक्षांच्या संपर्कात अनेक व्यक्ती येतात. असे असले तरिदेखील याबाबतीत अनेक अपवादात्मक प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, आजारी पक्षाच्या संपर्कात आल्याने बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. पक्षाची अंडी किंवा त्याची विष्ठा अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने धोका अधिक वाढतो.
हेही वाचा :बर्ड फ्लूच संकट! कडकनाथला वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न; वाचा केंद्राने दिलेली नियमावली
बर्ड फ्लूची ची लक्षणे कोणती?
-
बर्ड फ्लूचा विचार केला तर त्याची लक्षणे सामान्य फ्लूसारखे असतात. यामध्ये श्वास घेण्यास त्रास, मळमळ होणे, ताफ, सर्दी, डोक्यात दुखणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे इत्यादी लक्षणे जाणवतात.
-
जर माणूस कोंबड्यांच्या संपर्कात राहिला तर माणसांमध्ये या आजाराचा संसर्ग होतो. बर्ड फ्लूचा विषाणू डोळे, नाकातून तसेच तोंडातून शरीरात प्रवेश करतात.
-
बर्ड फ्लूचा विषाणू हा जास्त घातक नसून लोकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही असे आवाहन करण्यात येत आहे.
-
साधारणतः बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर २ ते ८ दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य फ्यूसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांमध्ये ताप, खोकला, घशात, उलटी, डोकेदुखी, सांधेदुखी, इनसोमनिया आणि डोळांचे आजार यांसारखी लक्षणे दिसून येतात.
- प्रौढ व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांनाही याच लक्षणांचा सामना करावा लागतो. तसेच हे व्हायरल संक्रमण वाढून न्यूमोनिया होऊ शकतो आणि कधी-कधी श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.
Share your comments