बर्ड फ्लूच संकट! कडकनाथला वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न; वाचा केंद्राने दिलेली नियमावली

07 January 2021 11:39 AM By: KJ Maharashtra
कडकनाथला वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न

कडकनाथला वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न

कोरोनाचे संकट मिटत नाही तोच आता बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. मध्यप्रदेशात सध्या बर्ड फ्ल्यूने अक्षरश थैमान घातले आहे. मध्यप्रदेशातील जवळ-जवळ ७ ते ८ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव वाढत आहे.

यामधील दिलासादायक बाब अशी की, बर्ड फ्लू अद्याप पोल्ट्री फार्मपर्यंत पोहोचला नाही. जवळ-जवळ चारशेहून अधिक कावळे यांचा मृत्यू झाला आहे. या बर्ड फ्लूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर झाबुवा जिल्ह्यातील कडकनाथ कोंबड्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा : बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यावसायिक अस्वस्थ ; दररोज होते कोट्यावधी अंडी आणि कोंबडीची उलाढाल

झाबुवा कृषी विज्ञान केंद्राचे निर्देशक डॉक्टर आय. एस. तोमर यांनी सांगितले की, जिल्हा मुख्यालयातील हॅचरीमध्ये कोंबड्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच कडकनाथ कोंबड्यांमधील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या पारंपारिक उपाय योजना तसेच विटामिनचा उपयोग केला जात आहे.

   केंद्र शासनाकडून नियमावली जारी

 बर्ड फ्लूचा संक्रमणाची शक्यता बळावत असताना केंद्र सरकारकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशा निर्देशानुसार पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना विविध प्रकारच्या विटामिनचा डोस दिला जात आहे. विशेष म्हणजे कडकनाथ कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव होऊ, नये यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहे. बाहेरील माणसांनी हॅचरीमध्ये जाण्यापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे.

 

तसेच हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध प्रकारच्या पारंपारिक उपाय योजना राबवल्या जात आहेत. मध्यप्रदेशमधील खरगोन इंदोर, मंदसौर, उज्जैन नीमच, सीहोर दत्तात्री जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कावळे यांचा मृत्यू होत आहेत. त्यामुळे पशुपालन विभाग अलर्ट वर आहे. जिथे कावळे मृतावस्थेत सापडत आहेत. त्या परिसरातील कावळ्याची तपासणे करण्यात येत असून पोल्ट्री फार्ममध्ये तपासणी सुरू आहे.

 

बर्ड फ्लू म्हणजे नेमकं काय?

 बर्ड फ्लू H5N1  इन्फ्ल्यूंझा व्हायरस मुळे होतो. बर्ड फ्लू हे एक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आहे. हा आजार फक्त पक्षांनाच नाही तर जनावर आणि माणसांना होऊ शकतो. संसर्ग झालेल्या पक्षाच्या संपर्कात आल्यास बर्ड फ्यु होऊ शकतो. योग्य वेळी आणि योग्य उपचार न मिळाल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते.

Kadaknath Bird flu centeral government बर्ड फ्ल्यू कडकनाथ केंद्र सरकार
English Summary: Bird flu crisis! Special efforts to save Kadaknath, read the rules given by the Center government

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.