गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात चांगला पाऊस पडेल असे सांगितले जात असताना मात्र पावसाने उशीर केला. यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडली होती. असे असताना आता मात्र काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता पेरणीच्या कामांना वेग आला आहे. असे असले तरी राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.
सध्या मुंबई आणि उपनगरासह अहमदनगर, यवतमाळ, रायगड, औरंगाबाद या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावासाने हजेरी लावली. जवळपास एक तास पाऊस कोसळल्याने पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले होते. कृषी विभागाने देखील पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका, असे म्हटले होते. यामुळे शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले होते.
तसेच औरंगाबाद सिल्लोड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. तालुक्यात जवळपास सर्वच मंडळामध्ये पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना आनंद झाला. तालुक्यातील अनेक नद्या पहिल्याच पावसात वाहू लागल्या आहेत. यामुळे आता येथील शेतकऱ्यांचे पाण्याचे टेंशन मिटले आहे. 24 जून 2022 ते 27 जून 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आता चलन न कापता पाहिजे तिकडे फिरा! ड्रायव्हिंग लायसन्सपासून मिळणार सुटका
यामुळे नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 24 जून ते 28 जून 2022 रोजी दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40 ते 50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरीत मच्छिमारांनी सदर कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या;
राज्यात हजारो कोटी रुपयांचे GR जारी करण्याचा धडाका, सरकार पडण्याची भीती
'५० हजारच्या प्रोत्साहन अनुदानासाठी जाचक अटी, सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक'
सेक्स सॉर्टेड सीमेन – काळाची गरज
Share your comments