1. पशुधन

सेक्स सॉर्टेड सीमेन – काळाची गरज

गाई म्हशींपासून दुग्धोत्पादन करणे हा शेतकर्‍यांसाठी उत्तम जोडधंदा आहे. संकरीत गाई किंवा म्हशींपासून दुग्धोत्पादन करून उत्तम असा चरितार्थ राबवणारे बरेच पशुपालक आहेत. वळू संगोपन करून गाय किंवा म्हैस फळविणे व पुढील वेतासाठी तयार करणे ही खर्चिक बाब पशुपालकांना परवडनारी नाही. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे गाय किवा म्हैस फळवने सध्याच्या परिस्थितीत सोपे झाले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Milk production cows buffaloes good side business farmers.

Milk production cows buffaloes good side business farmers.

गाई म्हशींपासून दुग्धोत्पादन करणे हा शेतकर्‍यांसाठी उत्तम जोडधंदा आहे. संकरीत गाई किंवा म्हशींपासून दुग्धोत्पादन करून उत्तम असा चरितार्थ राबवणारे बरेच पशुपालक आहेत. वळू संगोपन करून गाय किंवा म्हैस फळविणे व पुढील वेतासाठी तयार करणे ही खर्चिक बाब पशुपालकांना परवडनारी नाही. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे गाय किवा म्हैस फळवने सध्याच्या परिस्थितीत सोपे झाले आहे. परंतु, कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा करून जर नर पैदा झाला तर नर किवा रेडकाचा उपयोग कमी असल्यामुळे पशुपालकांना बर्‍याच प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.

गर्भ निर्मिती होताना नर किंवा मादीचा गर्भ तयार होणे हे शुक्रानू ठरवतात. याचा शोध बर्‍याच दशकाआधी लागला. पण सद्यस्थितीत नवीन तंत्रज्ञानाद्वारे शुक्राणूच्या केंद्रातील जणूकांच्या प्रमाणाचे मापन करून शुक्राणूंचे लिंग वर्गीकरण करण्यात येते. लिंग वर्गीकृत शुक्रानुपासून गोठीत वीर्य कांड्या तयार करण्यात आल्या असून त्यांचा वापर कृत्रिम रेतनासाठी करण्यात येतो.

सेक्स सॉर्टेड सीमेनचे फायदे / आवश्यकता
वाढत्या लोकसंख्येस दुधाचा पुरवठा होण्यासाठी दूग्ध उत्पादनात झपाट्याने वाढ होऊन ते दुप्पट होणे गरजेचे आहे व यासाठी जास्तीत जास्त कालवडीचे उत्पादन होणे गरजेचे आहे, या तंत्रज्ञानामुळे हे लवकरात लवकर शक्य होईल.
कालवडीच्या जन्माचे प्रमाण वाढल्यामुळे कळपाची वाढ झपाट्याने होते.
दुग्ध व्यवसायात दूध उत्पादनाची जलद गतीने वाढ होते.

प्रोजेनी टेस्टिंग कार्यक्रमासाठी लागणार्‍या उच्च प्रतीच्या गायी व पैदाशीसाठी लागणार्‍या वळूंची निर्मिती.
रोगमुक्त कळपाची निर्मिती होण्यास मदत होईल- बाजारातून आणलेल्या बर्‍याच गायी आजारी असू शकतात, पण जर आपण सॉर्टेड सीमेन वापरुन आपल्याच गोठ्यात मादी वासरे निर्माण केली तर ती रोगमुक्त, उत्तम प्रजननक्षम आणि जास्त दूध उत्पादन करणार्‍या असतील याची खात्री असते.
नर वासरे जन्माला येण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे चार्‍याची बचत होते, त्यामुळे चारा टंचाईचा प्रश्न सुटतो. तसेच, गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे जी नर वासरे रस्त्यावर सोडली जातात त्यामुळे वाहतुकीस जो त्रास होतो तो कमी होण्यास मदत होईल.
नर वासरांच्या जन्मामुळे गर्भकाळाचा वाया गेलेला वेळ वाचतो.

आता 'एक देश एक रेशन कार्ड', तुमच्या फायद्यासाठी देशभरात नवी योजना लागू

सॉर्टेड सीमेनच्या वापरासाठी जनावरांची निवड
सॉर्टेड सीमेन कालवडीणमध्ये ( प्रथम गर्भधारणा होणार्‍या ) प्राधान्याने वापरण्यात यावे.
त्यानंतर चांगल्या वंशावळीच्या गायी/ म्हशी ज्यांच्यामध्ये उत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता जास्त असलेल्या जनावरांमध्ये वापरावे.
कृत्रिम रेतनाची चांगली लक्षणे दाखवणार्‍या गायींमध्ये सॉर्टेड सीमेन प्राधान्याने वापरावे.
पहिल्या तीन वेतांच्या गायी / म्हशींमध्ये वापर करावा आणि व्याल्यानंतर ४५-६0 दिवसानंतरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या माजाच्या वेळी सॉर्टेड सीमेनचा वापर करावा, त्यामुळे गर्भधारनेचे प्रमाण जास्त राहील.

ज्या गायी/ म्हशी प्रजननक्षम, निरोगी आहेत, ज्यांचे शरीर मानांकन(बीसीएस) ३-४ आहे अशांमध्ये जर आपण तज्ञ पशुवैद्यकाकडून सॉर्टेड सीमेनने कृत्रिम रेतन केले तर जास्तीची मादी वासरे मिळतील.
वारंवार उलटणार्‍या(रिपीट ब्रीडर) गायींमध्ये सॉर्टेड सीमेन वापरण्याचे टाळावे.
कुठल्याही प्रकारच्या तणावाखाली असणार्‍या गायींवर (जसे उष्णतेचा आजार इ.) सॉर्टेड सीमेनचा वापर करू नये.

सॉर्टेड सीमेनच्या वीर्य कांड्यांची उपलब्धता
सध्या महाराष्ट्रात खालील दोन ठीकाणी सॉर्टेड सीमेनच्या वीर्य कांड्या उपलब्ध आहेत-
बायफ, उरूळीकांचन, पुणे –
येथे सध्या गायींच्या – साहिवाल, गिर, रेड सिंधी, थारपारकर आणि राठी या जातीच्या वीर्य कांड्या तयार होतात व मुर्हा आणि जाफराबादी या म्हशींच्या वीर्य कांड्या उपलब्ध आहेत.
चितळे डेअरी- भिलवडी, जि. सांगली.

'माझं काम ठोकायचं, गद्दारांना सोडणार नाही'

येथे एबीएस जीनस या कंपनीच्या मदतीने सध्या गायींच्या – होल्स्टन, जर्सी, साहिवाल, गिर आणि रेड सिंधी या जातीच्या वीर्य कांड्या तयार होतात व मुर्हा आणि मेहसाना या म्हशींच्या वीर्य कांड्या उपलब्ध आहेत.
सॉर्टेड सीमेनच्या वीर्य कांड्यांची किंमत
कंपनीमध्ये सध्या एका वीर्य कांडीची किमत रुपये- १०००- १२००/- एवढी आहे.
नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंदणी केली तर महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत शेतकर्‍यांना सॉर्टेड सीमेनची एक वीर्य कांडी रुपये ८१/- ला मिळू शकते.

डॉ.सुजाता सावंत
पशुधन विकास अधिकारी, ता.पाचोरा जि.जळगाव
डॉ. मंजुषा पाटील
सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी
डॉ. पंकज हासे
सहाय्यक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई

महत्वाच्या बातम्या;
आता चलन न कापता पाहिजे तिकडे फिरा! ड्रायव्हिंग लायसन्सपासून मिळणार सुटका
कांद्याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर का? अमोल कोल्हे यांनी घेतला मोठा निर्णय
"पेरणीसाठी कर्ज द्या, नाहीतर सावकाराकडे शेती गहाण ठेवावी लागेल"

English Summary: Sex Sorted Semen - Time Needed Published on: 25 June 2022, 09:31 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters