1. बातम्या

आनंदाची बातमी!उजनी मायनस मधून प्लसकडे,शेतकऱ्यांना मिळेल दिलासा

महाराष्ट्रात जुलै महिन्याची सुरुवात झाल्यापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीला देखील दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील बहुतेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून राज्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
water level growth of ujani dam

water level growth of ujani dam

महाराष्ट्रात जुलै महिन्याची सुरुवात झाल्यापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीला देखील दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील बहुतेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून राज्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अशा पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात देखील चांगला पाऊस होत असून त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. या सर्वदूर पडलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत असून आतापर्यंत या धरणामध्ये जवळजवळ साडेपाच टीएमसी पाणी आले आहे.

नक्की वाचा:उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत 'जोर'धार! महाराष्ट्रात 128 गावांचा संपर्क तुटला, वाचा सविस्तर माहिती

जर मागच्या काही दिवसांचा विचार केला तर उजनी धरण हे मायनस मध्ये गेले होते.परंतु आता हळूहळू उजनी धरणा प्लस मध्ये येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

तसेच खडकवासला आणि मुळशी(khadakwasla and Mulshi Dam)या दोन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनी धरणात देखील पाच दिवसात साडे पाच टीएमसी पाणी आले असून सात तारखेपासून आतापर्यंत साडेपाच टीएमसी पाणी जमा झाले आहे.

त्यामुळे हळूहळू उजनी धरण मायनस कडून प्लस कडे प्रवास करत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

नक्की वाचा:शेतीच्या पाण्याचा ताण मिटला! पाऊस आला एक दिवस परंतु 'या' जिल्ह्यातील धरणे झाले तुडुंब,19 धरणे 50 टक्क्यांच्या वर

 उजनी धरण आणि सोलापूर जिल्ह्याचा एक घनिष्ठ संबंध असून सोलापूर जिल्ह्याला या धरणाने एक वैभव प्राप्त करुन दिले आहे.

तसे पाहायला गेले तर सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडतो परंतु पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरण भरत  असल्याने सोलापूरची तहान लागते. उजनी धरणाचा उपयोग सोलापूर जिल्ह्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठीच नाही तर उद्योग तसेच शेती क्षेत्राला देखील होतो.

शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे धरण असून या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे या धरणामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तहसील भिगवण या परिसराला देखील पाणी मिळते.

नक्की वाचा:अवघडच झालं! पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, मतदारांकडून पुन्हा केली लाखाची वसुली

English Summary: heavy rain start in pune district so ujani dam water level growth Published on: 13 July 2022, 11:53 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters