1. हवामान

उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत 'जोर'धार! महाराष्ट्रात 128 गावांचा संपर्क तुटला, वाचा सविस्तर माहिती

संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पुरपरिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून महाराष्ट्रात पुरामुळे तब्बल 128 गावांचा संपर्क तुटला आहे. जर आपण या बाबतीत राजस्थान राज्याचा विचार केला तर तेथे देखील अनेक जिल्ह्यात 186 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
Heavy rain in maharashtra

Heavy rain in maharashtra

संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त प्रमाणात  वाढल्यामुळे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पुरपरिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून महाराष्ट्रात पुरामुळे तब्बल 128 गावांचा संपर्क तुटला आहे. जर आपण या बाबतीत राजस्थान राज्याचा विचार केला तर तेथे देखील अनेक जिल्ह्यात 186 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

याबाबत हवामान खात्याने माहिती दिली की, काल म्हणजे शनिवारी तेलंगणा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग तसेच गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला.

इतकेच नाही तर पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, गोवा, महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकात देखील मुसळधार पाऊस झाला आहे.

नक्की वाचा:Rain Alert: कोकण व मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट कायम,10 ते 13 जुलै दरम्यान 'या' ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

 देशातील पुर आणि पावसाच्या अपडेट

 याबाबत हवामान खात्याने पुढील पाच दिवसांपर्यंत मध्य भारत व पश्चिम किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून पंजाब, हरियाणा यूपीच्या उत्तरेतील भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यासोबतच महाराष्ट्रात अतिवृष्टी मुळे जवळजवळ 128 गावांचा संपर्क तुटला आहे.

तर मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड सह दुर्गम गडचिरोली जिल्ह्याला देखील पावसाने झोडपले असून मोठा फटका बसला आहे.

नक्की वाचा:राज्यात पावसाचा धुमाकूळ, 30 धरणे भरली, शेतकऱ्यांची काळजी मिटली..

तसेच दक्षिण भारताचा विचार केला तर कर्नाटक व तेलंगणा मध्ये देखील मुसळधार पाऊस होत असून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये देखील कुलू व चम्बा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पूरस्थिती उद्भवली. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत व वित्तहानी झाली नाही.

मध्यप्रदेश राज्यात देखील शनिवारी रात्री भोपाळ शहरात अतिवृष्टी होऊन जवळपास एक तास मुसळधार पाऊस झाला.

या पावसामुळे अवघ्या 24 तासातच सव्वा इंच पाऊस झाला आहे. तीच परिस्थिती राजस्थान, छत्तीसगड राज्यात देखील आहे.

नक्की वाचा:Rain Update: मुंबई पुन्हा तुंबली…! राजधानीत पावसाचं तांडव, मुंबईसमवेतचं 'या' ठिकाणी उद्या पण मुसळधारा; IMDचा अंदाज

English Summary: Heavy rain in all over india and flood situation arise in maharashtra Published on: 10 July 2022, 02:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters