1. बातम्या

मुसळधार पावसाने मोडले सोयाबीन उत्पादकांचे कंबरडे! पावसामुळे सोयाबीन खराब; शेतकरी संकटात

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरीप पिकांची काढणी सुरु असताना आलेल्या पावसाने पिके पाण्याखाली गेली आहेत.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
soyabean

soyabean

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील (Marathwada-Vidarbh) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरीप पिकांची (Kharip Crop) काढणी सुरु असताना आलेल्या पावसाने पिके पाण्याखाली गेली आहेत.

महाराष्ट्रात (Maharashtra) शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. राज्यात सध्या झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. सध्या राज्यात सोयाबीन (Soyabean), कापूस, धान पिकांची काढणी सुरू आहे.

अशा स्थितीत अवकाळी पावसामुळे तयार झालेले पीक खराब होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे जालना, लातूर, बीड आदी जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात सोयाबीन आणि मूग यांची सर्वाधिक लागवड केली जाते. बहुतांश शेतकरी सोयाबीनच्या लागवडीवर अवलंबून आहेत. सोयाबीन हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक आहे. पण, यंदा पावसाने शेतकऱ्यांच्या हातून तयार केलेले पीक हिरावून घेतले.

हिवाळ्यात या भाज्यांची लागवड करा आणि बंपर उत्पन्न कमवा; आरोग्यासही आहेत लाभदायक

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका

सोयाबीन उत्पादकांसाठी (Soybean growers) हे वर्षही निराशाजनक ठरल्याचे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली तर दुसरीकडे पावसाने सर्व काही उद्ध्वस्त केले. अशा स्थितीत सोयाबीन उत्पादकांचे दुहेरी नुकसान होत असून, सध्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल 3000 ते 4000 हजार रुपये भाव मिळत आहे.

सोयाबीनच्या शेंगा शेतात कुजल्या

जालना जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. त्यामुळे कापूस, मूग, सोयाबीनचे अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात राहणारे शेतकरी योगेश शिंदे यांनी 2 एकरात सोयाबीनची लागवड केल्याचे सांगितले.

त्यांचे पीक पूर्णपणे तयार झाले होते, मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा शेतात सडत आहेत. इतर शेतकऱ्यांच्या शेतातही हीच स्थिती आहे. अशा स्थितीत आता पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांना भीक नको, कुत्रे आवरा... रक्षकच झाले भक्षक! जिल्ह्याधिकारी कार्यालयावर शेतकऱ्याने लावलं पोस्टर

या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झाले आहे

अकोला जिल्ह्यात 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील तेल्हारा, मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यातील आठ हजार १२४ हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे.

त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सुमारे 19 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पालघर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे ७५ हजार हेक्टरपेक्षा जास्त भातशेतीचे क्षेत्र पावसामुळे अडचणीत आले आहे.

महत्वाच्या बातम्या:
राज्यात परतीच्या पावसाचे थैमान! शेतीला मोठा फटका; शेतकरी चिंतेत
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान! या रोगापासून करा लिंबाचा बचाव अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: Heavy rain broke the backs of soybean producers! Soybeans damaged by rain Published on: 15 October 2022, 09:35 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters