ऑक्टोबर 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गट-क आणि गट-ड या संवर्गासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.
यावर आता नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, ज्या उमेदवारांनी ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत परीक्षा दिली होती, अशा उमेदवारांना आता नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यामध्ये पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
नक्की वाचा:Uddhav Thackeray| उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, आता पुढे काय….
हा निर्णय घेण्यामागे होती ही कारणे
एका खासगी कंपनीच्या माध्यमातून आरोग्य विभागातर्फे ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु या परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार एमपीएससी समन्वय समितीने पुणे सायबर पोलिसांकडे दाखल केली.
त्यानंतर झालेल्या पोलिस तपासात या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले व एवढेच नाही तर हा तपास चालू असताना टीईटी परीक्षेतील घोटाळा देखील समोर आला.
या दोन्ही प्रकारात चौकशी चालू असताना या गैरप्रकारांना मध्ये समाविष्ट असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून याचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या सगळ्या परिस्थितीमुळे या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिक्षेत जो काही गैरप्रकार झाला होता
याचा पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू असून या सगळ्या प्रक्रियेस लागणारा वेळ लक्षात घेऊन या दोन्ही संवर्गातील परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे.
परंतु यामध्ये ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती अशा उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांच्यासाठी कुठलाही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही.
Share your comments