1. बातम्या

ग्रामपंचायतीचा धुराळा! राज्यातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी

राज्यात सध्या राजकारणाचे मोठे महाभारत सुरू असून एक राजकीय फिवर चढला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सगळ्या धामधुमीतच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 62 तालुक्यातील जवळजवळ 271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आयोगाने त्यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
271 graampanchyat election programme declare by state election comition

271 graampanchyat election programme declare by state election comition

राज्यात सध्या राजकारणाचे मोठे महाभारत सुरू असून एक राजकीय फिवर चढला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सगळ्या धामधुमीतच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 62 तालुक्यातील जवळजवळ 271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आयोगाने त्यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे.

या निवडणुकांची आचारसंहिता हे पाच जुलै रोजी लागू होणार असून चार ऑगस्ट रोजी मतदान होईल आणि पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे ज्या ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे,  त्या त्या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी गाजणार हे नक्की.या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका आहेत

अशा ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील,असे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

नक्की वाचा:महाराष्ट्रातील खरीप पेरणी असमाधानकारक; राज्य सरकार घेणार पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा

 अशा पद्धतीचा राहील निवडणूक कार्यक्रम

1- तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक- पाच जुलै 2022 वार मंगळवार

2- नामनिर्देशन पत्रे अर्थात अर्ज मागवण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ- 12 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 पर्यंत वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत

3- नामनिर्देशन पत्र अर्थात अर्जाची छाननी करण्याचा दिनांक- 20 जुलै 2022

4- नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक- 22 जुलै 2022

नक्की वाचा:7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात मिळणार इतके पैसे, वाचा डिटेल्स

5- निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक- 22 जुलै 2022( दुपारी तीन नंतर)

6- मतदानाचा दिनांक- 4 ऑगस्ट 2022

7- मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक- पाच ऑगस्ट 2022

 जिल्हानिहाय ग्रामपंचायतीच्या निवडणुका

धुळे 52,नाशिक 40,जळगाव 24, पुणे 19, सोलापूर 25, अहमदनगर 15, सांगली एक, सातारा 10, सोलापूर 25, औरंगाबाद 16, जालना 28,  बीड 13,  उस्मानाबाद 11,बुलढाणा 5, परभणी 3, लातूर 9

नक्की वाचा:Ration Card: मोठी बातमी! या तारखेपर्यंत मिळणार मोफत रेशन, नंतर बंद होणार फ्री रेशन

English Summary: 271 graampanchyat election programme declare by state election comition Published on: 29 June 2022, 05:55 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters