अनेक घडामोडींनंतर अखेर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, यामध्ये अनेक जुन्या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काहींचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे आजच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये आता ज्या नेत्यांनी शपथ घेतली आहे, त्यांची संपत्ती आणि शिक्षणाची सध्या चर्चा सुरू आहे. यामुळे शपथविधीनंतर याची चांगलीच चर्चा रंगली होती.
आता नव्या मंत्रिमंडळातील एक मंत्री 10 वी पास आहे तर पाच मंत्री बारावी पास आहेत. यासह एक इंजिनिअर, 7 पदवीधर, 2 पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. एकाने डॉक्टरेट मिळवलेली आहे. भाजपाचे मीरजचे आमदार सुरेश खाडे हे सर्वाधिक उच्च विद्याविभूषित आहेत. यामुळे काही न शिकलेले मंत्री तुमच्या राज्याचा कारभार बघणार आहे.
तसेच यामध्ये आज शपथविधी झालेल्या 18 मंत्र्यांपैकी 70 टक्के जणांवर राजकीय आणि अपराधी स्वरुपाते गुन्हे दाखल झालेले आहेत. 12 कॅबिनेट मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर अपराधी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच सर्वाधिक जास्त संपत्ती ही मलबार हिलचे भाजपाचे आमदार आणि नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या नावावर आहेत.
आता बिहारचा नंबर! उद्या बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होणार? जेडीयूने खासदार-आमदारांची बैठक..
शिंदे गटाचे प्रवक्तेपद सांभाळणारे दीपक केसरकर आहेत. त्यांच्याकडे 82 कोटींची संपत्ती आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर 38 दिवसानंतर पार पडला. यामध्ये अनेकजण नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे लक्ष लागले होते, तसेच एकही महिला मंत्री म्हणून याठिकाणी शपथ घेतली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
ब्रेकिंग! बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीशकुमार सरकार पडले, भाजपच्या 16 मंत्र्यांचा राजीनामा
अशी वाईट परिस्थिती कोणाच्या वाट्याला न येवो! पैसे नसल्याने पाकिस्तानने विकायला काढले वाघ, सिंह
Share your comments