जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागात असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी चांगलेच आक्रमक झाले
कृषी विभागातील रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी स्वपक्षाच्या मंत्र्यांकडे असलेल्या कृषी खात्याला अल्टिमेटम देऊन टाकला टाकला. मे महिन्याच्या अखेरपर्यंत जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागातील जागा न भरल्यास 'मंत्रालय हलवून टाकेल' अशा शब्दात ते व्यक्त झाले. यासंबंधीची बातमी सकाळ वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात रिक्त पदे भरणे बाबतची माहिती घेतली. यामुळे 31 मे च्या अखेरपर्यंत जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागातील रिक्त पदे भरली जातील, असे आशयाचे आश्वासन राज्याचे कृषी सचिव तसेच कृषी मंत्र्यांनी दिली असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दिली. यांनी म्हटले की, यावर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील अर्धा जळगाव जिल्हा केळी व कापूस पिकवणारे आहे. जर सैनिक नसतील तर लढाई कशी लढणार? आता खरीप हंगाम तोंडावर आहे. विविध प्रकारची नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांवर येतात व पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
अशा पार्श्वभूमीत अनेक योजना राबवायची असतात. परंतु कृषी विभागात कर्मचारीच नसेल तर कृषी विभागाचे काम कसे चालेल? नाशिक विभागात कृषी विभागाच्या 98 टक्के पदे भरली आहेत. एवढेच नाही तर इतर जिल्ह्यांमध्ये देखील कृषी विभागात पदे भरली गेली आहेत. मग केवळ जळगाव जिल्ह्यावर अशा प्रकारचा अन्याय का? दोन वर्षापासून कमी कर्मचारी संख्या असताना कृषी विभाग काम करीत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरा नाहीतर मंत्रालय हलवून टाकीन असे सांगितल्याने मे महिन्याच्या अखेरच्या बदल्या होतात, त्यात जळगाव कृषी विभागाची रिक्त पदे भरण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले.(स्रोत-सकाळ)
महत्वाची बातमी
नक्की वाचा:पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरील पेच ; जगाची भूक भागवायची की भारतीयांना सुखी ठेवायचे?
Share your comments