महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठअंतर्गत असणाऱ्या सर्व कृषी पदवी विद्यार्थी सातव्या सत्रात प्रत्यक्ष शेतात जाउन मार्गदर्शन करीत असतात. ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्यागिक जोड (रावे) कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील गावात सहा महिने हा उपक्रम राबवयाचा असतो. त्या अंतर्गतच कृषी महाविद्यालय अकोला (डॉ.पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठ अकोला) च्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील शेलगाव या गावी शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले.The students guided the farmers about fodder processing in Shelgaon village of the district.यामध्ये कृषी संशोधन केंद्र, वाशिम चे डॉ. बी. डी.गीते सर, कृषी महाविद्यालय, अकोला (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. नागरे सर व सोबतच संबंधित
विद्यार्थ्यांचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उज्जैनकर सर, डॉ. खंबलकर सर व डॉ. खाडे सर यांच्या मार्गदर्शनाने कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी कमलेश राठोड, अनंत कुमार वर्मा, आदित्य गंगावणे, राम चांडक, उमेश वाघ आणि लक्ष्मण साहू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व सोबतच चारा
प्रक्रियेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.यावेळी विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. सोबतच चारा प्रक्रियेची गरज व फायदे पटवून दिले. कृषी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या प्रात्यक्षिकाबद्दल गावकऱ्यांकडून व शेतकऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.
Share your comments