
प्रतिनिधीक छायाचित्र
अनेक दिवासांपासून अडचणीत सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कोरोना व्हायरसमुळे द्राक्षांची निर्यात थांबविण्यात आली होती, मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस निर्यात सुरू झाली आहे. निर्यात पुन्हा सुरू होऊन साधारण तीन दिवस झाले असून आतापर्यंत २० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चालू वर्षी निर्यातीसाठी सुमारे ३८ हजार द्राक्ष बांगांची नोंदणी झाली आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात सुरू केली होती. राज्यातून २१ मार्चपर्यंत ५ हजार ६०० द्राक्ष कंटेनरद्वारे जवनळपास ७८ हजार टन द्राक्ष नेदरलँड, युके, जर्मनीला पाठविण्यात आले होते. मात्र शासनाने कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू केल्याने निर्यात थांबविण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक बाजारात ही दर कमी मिळत होता. लॉकडाऊनच्या स्थितीमुळे खरेददार बाहेर पडत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. कृषी विभाग, अपेडा, निर्यातदार संस्था आणि एनआरसी ग्रेप यांच्यामार्फत संबंधित विभागाच्या समन्वयाने निर्यात सुरू झाली आहे.
त्यामुळे १ एप्रिलपर्यंत युरोपला ७९ हजार ५०० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. निर्यात सुरू झाल्यानंतर ३० मार्च रोजी द्राक्षाचे ३८ कंटेनर युरोपला पाठविण्यात आले. तर ३१ मार्चला १९ तर एप्रिलला ११ असे एकूण ६८ कंटनेर द्राक्ष निर्यात झाली आहे. राज्यातून सर्वाधिक निर्यात सांगली आणि नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. यासह सोलापूर, लातूर, याभागातून निर्यात झाली असून पण नाशिक सांगलीच्या तुलनेने कमी आहे. दरम्यान स्थानिक बाजारपेठेत उत्पादक ते ग्राहक अशी गटांमार्फत विक्री सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे परवानेही मिळवून देण्यासाठी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान शासनाने अत्यावश्यक सेवेमध्ये फळे व भाजीपाला त्याचबरोबर खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल यांचाही समावेश केला आहे. याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेले कंटनेर चालू ठेवण्याचे आदेश दिले. मुंबईतील जेएनपीटी बंदर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादका शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा मिळाला आहे.
Share your comments