1. बातम्या

Grape Farming: द्राक्ष उत्पादक संघटनेचा एक निर्णय ठरेल द्राक्ष शेतीच्या समस्यांवर रामबाण उपाय?वाचा सविस्तर

गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण पाहत आहोत की, हवामान बदल आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यासोबतच किडींचा मोठ्या प्रमाणावर होणारा प्रादुर्भाव देखील एक मोठी समस्या द्राक्षबागायतदार समोर आ वासून उभी आहे. बऱ्याचदा बाजारपेठेत देखील योग्य भाव न मिळाल्यामुळे देखील द्राक्ष बागायतदारांचे फार मोठे नुकसान होते. महाराष्ट्रामध्ये सांगली आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
grape farming

grape farming

गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण पाहत आहोत की, हवामान बदल आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यासोबतच किडींचा मोठ्या प्रमाणावर होणारा प्रादुर्भाव देखील एक मोठी समस्या द्राक्षबागायतदार समोर आ वासून उभी आहे. बऱ्याचदा बाजारपेठेत देखील योग्य भाव न मिळाल्यामुळे देखील द्राक्ष बागायतदारांचे फार मोठे नुकसान होते. महाराष्ट्रामध्ये सांगली आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड आहे.

या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आता चक्क पीकपद्धतीत बदल करायचा विचार केला असून दुसरीकडे द्राक्ष लागवडीत ज्या काही  अडचणी येतात त्या सुटाव्यात यासाठी द्राक्ष उत्पादक संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

नक्की वाचा:महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! आठ लाख हेक्टरमधील उभी पिके उद्ध्वस्त

तो म्हणजे  या सगळ्यात टीमने आता नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ ग्रेप्सशी करार केला असून या माध्यमातून आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि होणारे नुकसान कमी करण्यासाठी मदत होईल असा दावा करण्यात येत आहे.

या नवीन संशोधन समितीमध्ये नामवंत शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आल्याचे राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले. याशिवाय कृषी विद्यापीठाचे देखील सहकार्य मिळणार आहे.

नक्की वाचा:फार मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या 15 किलोच्या डब्यामागे 300 ते 700 रुपयांनी घसरण,वाचा नवीन दर

द्राक्ष शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाची होईल देवाण-घेवाण

 द्राक्ष बागेवरील विविध प्रकारच्या कीड व रोगांचा सामना कसा करायचा यावर ही संस्था संशोधन करणार असून या संस्थेला कृषी विद्यापीठाच्या देखील अनमोल सहकार्य मिळणार आहे.

ही संस्था आणि कृषी विद्यापीठ यांच्या संशोधनाच्या माध्यमातून जे काही तंत्रज्ञान निर्माण होईल ते द्राक्ष शेतात आणले जाणार आहे. हे सगळे फायदे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी टीमने हा सदर निर्णय घेतला आहे.

कृषी विद्यापीठ आणि आणि ही संस्था यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचवून त्यांचे उत्पादन कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

या सगळ्या प्रयत्नांचा काय परिणाम होतो आणि द्राक्ष उत्पादकांना त्याचा कितपत फायदा मिळतो हे येणारा काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नक्की वाचा:अरे व्वा! गोमूत्र आणि शेणापासून तयार होणारं खत आणि औषध, सेंद्रिय शेतीला चालना मिळणार

English Summary: grape productive farmer taking crucial decision for solve problem to grape farming Published on: 25 July 2022, 07:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters