देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी अद्याप कोणतीच लस उपलब्ध नसल्याने सोशल डिस्टन्सिग हाच उपाय आहे. यासाठी सरकार देशात लॉकडाऊन लागू केला आहे. पण लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. या सर्व परिस्थितीत गरिब जनतेचे मोठे नुकसान होत आहे. गरिब जनतेवर अधिक बोजा पडून नये, यासाठी सरकारने अनेक दिलासादायक निर्णय घेतले आहेत. शुक्रवारी सरकारने जनधन खाते असलेल्या महिलांना मोठी भेट मिळाली आहे.
जनधन बँक खाते असलेल्या ४ कोटी महिलांच्या खात्यात सरकारने तब्बल ३० हजार कोटी रुपये टाकले आहेत. यासह उज्ज्वला योजने अंतर्गत ८ कोटी गरीब कुटुंबांना एलपीजी देण्यात आला असून त्यांच्या खात्यात ५ हजार कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. पंतप्रधान जनधन ट्रान्सफऱ योजनेच्या पहिल्या दिवशी ४ कोटी महिलांच्या जनधन खात्यात ५००-५०० रुपये टाकण्यात आले आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला याचा फायदा व्हावा यासाठी निष्क्रिय असलेले बँक खाते परत सक्रिय करावीत असे निर्देश बँकांना देण्यात आली आहेत. दरम्यान पैसे काढण्यसाठी बँकेत गेल्यास सोशल डिस्टंन्सिग पाळावी असं अर्थमंत्रालयाकडून लाभार्थ्यांनी सांगण्यात आले आहे. साधारण ९ एप्रिलपर्यंत सर्व जनधन खात्यांमध्ये ही राशी येईल. यासह उज्ज्वला योजनेतून तीन गॅस सिलिंडरच्या मोफत खरेदीसाठी केंद्राने ५ हजार कोटी रुपयांचा निधी आठ कोटी गरिब कुटुंबांच्या लिंक खात्यामध्ये टाकण्यात आला आहे. सरकारी कंपन्या मे आणि जून महिन्याच्या चार तारखेपासून आधी अग्रिम रुपात धन राशी हस्तांतरित करतील, जेणेकरुन ग्राहक एलपीजी सिलिंडर खरेदी करु शकतील.
Share your comments