सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. असे असताना आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या ( Farmers Suicide) रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीआधी प्रति एकरमागे दहा हजार रुपये देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे.
यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या निकषावर सरकार देखील सकारात्मक असल्याचं राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितलं आहे. यामुळे हा निर्णय लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. अब्दुल सत्तार बुधवारी (17 मे) पालघर (Palghar) जिल्ह्यातील चिंचणी येथे शेतकरी मेळाव्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 25 पेक्षा अधिक उपायोजना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना आणणार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) म्हणाले. यामुळे सध्या याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांच नाव! कारणही सांगितलं...
राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील आहे आणि शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या आम्ही करू, असं मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे. तसेच पालघरमध्ये होत असलेला युरियाचा (Urea) काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिलं.
तेलंगणामध्ये सरकार करणार हमीभावाने ज्वारीची खरेदी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना आणणार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) म्हणाले. सध्या पावसाळा तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांची तयारी सुरु आहे.
कांद्याला बाजार नाही, आता मिळणार कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान, फलोत्पादन मंत्र्यांची महिती
काँग्रेसच ठरलं! अखेर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
ऊस बिलासाठी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला, हर्षवर्धन पाटलांच करायचं काय, खाली मुंड वर पाय, शेतकऱ्यांच्या घोषणा
Share your comments